मुंबई | उल्हासनगर महानगरपालिका विविध रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. एकूण 15 रिक्त पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. (Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2023)
ही पदभरती राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कार्यक्रम (NUHM) अंतर्गत केली जाणार आहे. यामध्ये फिजिशियन (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी विशेषज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एपिडेमोलॉजिस्ट, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी ही रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.
यासाठी उल्हासनगर महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग येथे दर सोमवारी मुलाखती ठेवण्यात आलेल्या आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी वैद्यकीय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगर पालिका, उल्हासनगर – 3 येथे दर सोमवारी दुपारी 12 ते सायं. 5 वाजेपर्यंत थेट मुलाखतीस (WALK IN INTERVIEW) उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी www.uc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
PDF जाहिरात – Ulhasnagar Mahanagarpalika Vacancy
अधिकृत वेबसाईट – www.umc.gov.in