गगनबावड्यात आढळले दोन दुर्मीळ साप; जाणून घ्या.. | Two rare snakes found in Gaganbawada
गगनबावडा | गगनबावडा परिसरात दोन दुर्मीळ साप सापडल्याची नोंद करण्यात आली आहे. भुईबावडा घाट परिसरात फिरत असताना गगनबावडा ग्रामीण रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. अमित पाटील आणि त्यांचे सहकारी तेजस पाटील यांना पाण्यात एक साप दिसला. डॉ. पाटील यांना प्रथमतः तो \’पाणदिवड\’ असेल असे वाटले पण नंतर जवळून निरीक्षण केल्यावर तो वेगळा साप असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
वेगळा साप असल्याची बाब ध्यानात आल्यानंतर, या सापाचे फोटो डॉ. अमित पाटील यांनी सरिसृपतज्ज्ञ वरद गिरी यांना पाठविले. गिरी यांनी या सापाचे नाव Rhabdops aquaticus असल्याचे सांगितले. या सापाचा शोध अगदी अलीकडेच लागला आहे.
याशिवाय, डॉ. पाटील यांना करूळ घाट परिसरात ‘कवड्या’ सापांपैकी दुर्मीळ प्रजाती असणाऱ्या ‘त्रावणकोर कवड्या सापा’चेही अस्तित्व आढळून आले आहे. कवड्या हा बिनविषारी साप असून भिंतींवर किंवा उंचावर चढण्याचे विशेष कसब त्याच्या अंगी असते.