Tuesday, September 26, 2023
HomeNewsएलन मस्कने ट्विटरचे नामोनिशान मिटवले.. आता काय?

एलन मस्कने ट्विटरचे नामोनिशान मिटवले.. आता काय?

एलन मस्कने (Elon Musk) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) खरेदी केल्यानंतर ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहे. अलीकडेच एलन मस्कने ट्विटरच्या नवीन सीईओ म्हणून लिंडा याकारिनो (Linda Yaccarino) यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर एलन मस्कने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

मस्कने आता ट्विटरचा लोगो (Twitter Logo) आणि नाव दोन्ही बदलून टाकलं आहे, (Twitter Rename) या नवीन बदलासह ट्विटर युजर्ससाठी उपलब्ध झाले आहे. (Twitter Logo Changed)  ट्विटर ओपन करण्यासाठी आता x.com असा वेब एड्रेस टाकावा लागणार आहे.

ट्विटरचा निळा रंग आणि त्याच्या लोगोवर असलेले चिमणी ही खास ओळख होती. मात्र आता ती ओळख बदलून X नाव देत लोगो बनवण्यात आला आहे. ट्विटरच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याची माहिती देण्यात आली आहे. ट्विटरच्या नवीन सीईओ लिंडा याकारिनो यांनीही ट्वीट करत X नावाबाबत माहिती दिली आहे. तर खुद्द मस्कने देखील आपले प्रोफाईल पिक्चर बदलले असून X लोगो लावला आहे. 

ट्विटरमधील बदलात नाव आणि लोगो बदलण्याचा निर्णय आत्तापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय आहे. ट्विटरच्या नव्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी ट्विट करत म्हटले आहे की, लाइट, कॅमेरा आणि एक्स… त्याचबरोबर एका इमारतीवर X लोगोला लाइटिंग केल्याचे दिसत आहे. 

एलन मस्क यांना एका ट्विटर युजरने विचारलं की, ट्विटरचं नाव X असं केल्यानंतर ट्विट्स शब्दाचा वापर केला जाणार का? प्रत्युत्तरादाखल मस्क यांनी सांगितलं की, आम्ही पोस्टला An X अशा नावाने संबोधू.

मस्क यांनी गेल्या वर्षी 44 बिलियन डॉलरमध्ये ट्विटर खरेदी केले होते. यानंतर आतापर्यंत ट्विटरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. ट्विटरमध्ये होणारे बदल आणि मस्क यांच्या व्यवस्थापनामुळे अनेक एडव्हर्टायजर्सनी हा प्लॅटफॉर्म सोडला होता. यामुळे कंपनीला मोठा फटकाही बसला आहे. तरीही मस्क सातत्याने बदल करण्याचे प्रयत्न करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular