News

कालव्यात ट्रॅक्टर पडून चालक जागीच ठार | Kolhapur Accident News

कोल्हापूर | ऊस वाहतुक करणाऱ्या रिकाम्या ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने कालव्यात पडून चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भुदरगड तालुक्यात घडली आहे. विशाल बबन शिंदे (वय ३५, रा. व्हनगुत्ती, श्रीनगर, ता. भुदरगड) असे या घटनेत मृत झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि.२३) मध्यरात्रीच्या सुमारास कूर (ता. भुदरगड) येथे घडली असून घटनेची नोंद भुदरगड पोलिसात झाली आहे.

घटनास्थळावरुन व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी मध्यरात्री गारगोटी – कोल्हापूर राज्य मार्गावर कूर नजीक दुधगंगा उजव्या कालव्याच्या पुलावर चालक विशाल शिंदे याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये ट्रॅक्टर (MH-2O- AS- 3796) चे मोठे नुकसान झाले असून चालकाचा ट्रॅक्टरखाली सापडून जागीच मृत्यू झाला.

संबंधित चालक शेजारील गावातील असल्याने घटनेची माहिती मिळताच तत्काळ नागरिक जमा झाले. नागरिकांनी भुदरगड पोलीस स्टेशनला अपघाताची माहिती दिली . पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत मृत चालक शिंदेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. विशालच्या पश्चात वयोवृद्ध आई – वडील, तेरा वर्षाचा मुलगा, अकरा वर्षाची मुलगी, पत्नी असा परिवार आहे. अधिक तपास पोलिस हेड कॉन्टेबल सुभाष चौगले करत आहेत.

Back to top button