8.1 C
New York
Friday, December 1, 2023

Buy now

Touchscreen Bike पाहिली का? बोटांनीच होते कंट्रोल, आहे ना भन्नाट!!

कारमध्ये मिळणारे टचस्क्रीनचे फीचर आता बाईक (Touchscreen Bike) मध्ये देखील मिळत आहे म्हणटल्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु हे खरं आहे. दिवसेंदिवस अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अविष्कार पहायला मिळत असताना टचस्क्रीन बाईक (Touchscreen Bike) बाजारात येणं सहाजिकच आहे. सध्या मॉर्डन बाईकमध्ये डिजिटल डिस्प्ले दिसत आहेत. पण त्याचा वापर मर्यादीत आहे. हे फिचर टचस्क्रीन नाही. मात्र काही बाईक निर्मात्या कंपन्यांनी बाजारात टचस्क्रीन फिचर असलेल्या बाईक आणल्या आहेत.

या’ कंपन्यांच्या आहेत टचस्क्रीन बाईक (Touchscreen Bike)

आंतरराष्ट्रीय दुचाकी बाजारात हार्ले-डेव्हिडसन आणि इंडियन मोटारसायकल कंपन्या त्यांच्या बाईकमध्ये टचस्क्रीनचा वापर करत आहेत. या दोन्ही अमेरिकन ब्रँड्सच्या बाईकमध्ये टचस्क्रीन सहज उपलब्ध आहे. हार्ले डेव्हिडसन आणि इंडियन मोटारसायकलने स्वतःची इन्फोटेन्मेट सिस्टिम विकसीत केली आहे. त्याला टचस्क्रीन देण्यात आली आहे. हार्ले-डेव्हिडसनच्या इन्फोटेनमेंट सिस्टिमचे नाव Boom Box आहे. तर इंडियन मोटारसायकलच्या नवीन सिस्टिमचे नाव Ride Command असे आहे. या दोन्ही सिस्टिम वाहनधारकांना टचस्क्रीन डिस्प्ले फीचर देतात.

‘या’ बाईकच्या मॉडेलमध्ये आहे टचस्क्रीन

हार्ले डेव्हिडसनच्या Street Glide बाईकमध्ये बूम बॉक्स इन्फोटेनमेंट सिस्टिमसह टचस्क्रीन मिळते. इंडियन मोटरसायकलच्या Roadmaster आणि Chieftain Elite या सारख्या बाईकमध्ये टचस्क्रीनची सुविधा देण्यात आली आहे. रोडमास्टर आणि चीफटेन एलिटसाठी जवळपास 40-47 लाख रुपये मोजावे लागतात. तर Street Glide साठी जवळपास 37.49 लाख रूपयांचे बजेट खर्च करावे लागते.

Touchscreen Bike मध्ये हे आहेत फिचर्स

बोट लावताच टचस्क्रीन डिस्प्ले सर्व माहिती देईल. या टचस्क्रीनमध्ये GPS नॅव्हिगेशन, हवामानातील बदल, बाईकचा वेग, समोरील वाहतूकीची सध्यस्थिती, कुठे ट्रॅफिक जास्त आहे, कुठे कमी आहे, कुठे रस्ता मोकळा आहे याची आगाऊ माहिती देईल. तसेच यापूर्वी बाईक कुठे उभी केली ते कळेल. AM/FM रेडिओ, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, युएसबी ऑडिओ डिव्हाईस यासारखे अनेक फीचर्स या टचस्क्रीन सिस्टम मध्ये उपलब्ध आहेत.

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles