पोटाचा घेर कमी करायचा आहे, करून पहा हे उपाय l Tips for Belly Fat

0
199

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला व्यायाम करणे शक्य होत नाही. अशातच जेवण वेळेत न केल्याने पोटाचा घेर वाढत जातो. व्यायामाने पोटाचा घेर कमी करता येतोच परंतु त्याचबरोबर आहारातील छोट्या बदलांनी सुध्धा पोटाचा घेर कमी करता येतो. (Tips for Belly Fat) हे छोटे बदल खूप महत्वाचे असतात. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत पोटाचा घेर कमी करण्याचे उपाय.

Tips for Belly Fat

योग्य प्रमाणात कर्बोदके घ्या

आहारात कर्बोदके असणाऱ्या घटकांचा योग्य प्रमाणात समावेश करणे महत्वाचे आहे ज्यांना पोटाचा घेर कमी  करायचा आहे अशांनी कर्बोदके असणारे घटक शक्यतो टाळावेत. यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकता.

साखर टाळा

जर तुम्हाला हेल्दी राहायचे असेल आणि पोटाचा घेर वाढू द्यायचा नसेल (Tips for Belly Fat) तर तुम्ही साखर खाणे पूर्णपणे बंद केले पाहिजे. कारण साखरेतील घटक चरबी वाढविण्याचे काम करतात.

मद्यपान टाळा

बऱ्याचदा पोटाचा घेर वाढण्यामागे मद्यपान हेही एक कारण असते. त्यामुळे शक्य तेवढे मद्यपान टाळावे किंवा प्रमाण तरी कमी करण्याचा प्रयत्न करावा.

दररोज सकाळी कोमट पाणी प्या

सगळ्यात सोपी परंतु खूपच महत्वाची गोष्ट म्हणजे दररोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी प्यावे. शक्य झाल्यास मेथी किंवा जिरे पावडर मिक्स करून घ्यावे. (Tips for Belly Fat) यामुळे तुमचा पोटाचा घेर कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

प्रत्येक घास चावून खा

आपल्याला जेवणाच्या वेळा पाळणे शक्य नसेल तर किमान जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा प्रत्येक घास बारीक चावून खाण्याचा प्रयत्न करा. यामुळे अन्न बारीक चावले जाईल व पचनास प्रॉब्लेम येणार नाही. परिणामी तुमची प्रकृती चांगली राहील.

संध्याकाळी हलके जेवण घ्या

सकाळच्या किंवा दुपारच्या जेवणात जड अन्न खाल्ले तरी चालते परंतु शक्यतो संध्याकाळी हलके अन्न घ्या. ज्यामुळे रात्री पचन नीट होईल व चरबी तयार होणार नाही.

अशाप्रकारे वरील साधे आणि सोप्पे उपाय जर आपण रोजच्या दिनक्रमात अवलंबले तर आपल्याला पोटाचा घेर नक्कीच कमी झाल्याचे दिसून येईल. (Tips for Belly Fat) याबरोबरच दररोज किमान अर्धा तास व्यायाम किंवा चालणे जे शक्य असेल ते केल्यासही आपल्याला पोटाचा घेर कमी होण्यास मदत होईल.

(हे उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या)