चांगल्या त्वचेसाठी ‘या’ पाच गोष्टी टाळाच: Things to Avoid to Get Healthy Skin

तुम्हाला नितळ आणि चांगली त्वचा हवी असेल तर खाली दिलेल्या सर्व गोष्टी टाळाच कारण त्या जर तुमच्या त्वचेला सूट होत नसतील तर त्या तुमची त्वचा निस्तेज आणि खराब करू शकतात. आपण बऱ्याचदा वेगवेगळे व्हिडीओ पाहून आपल्या त्वचेवर प्रयोग करत असतो. परंतु हे करत असताना आपण आपली त्वचा डॅमेज तर होत नाही ना याकडे लक्ष द्यायला हवे. चला तर मग पाहूया कोणत्या आहेत या गोष्टी ज्या आपल्याला टाळायला हव्यात…

चेहऱ्यावरील पिंपल्ससाठी टूथपेस्टचा Toothpaste वापर करू नये, टूथपेस्टमधील घटकांमुळे चेहरा काळवंडतो.

लिंबू Lemon आरोग्यवर्धक असेल तरी ते आहारातून घेणे महत्वाचे, लिंबुचा रस चेहऱ्यावर चोळल्यास चेहरा खराब होण्याची शक्यता जास्त असते.

कोणताही फेसपॅक बनवताना त्यामध्ये बेकिंग सोडा Baking Soda वापरणे धोकादायक आहे, यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स वाढतात.

गरम पाण्याने Hot Water चेहरा धुणे त्वचेसाठी अत्यंत हानिकारक ठरते, यामुळे त्वचेचा टवटवीतपणा निघून जातो व त्वचा राठ होते.

व्हिनेगरचा Vinegar वापर टाळा, कारण यामुळे रॅशेश येऊ शकतात व त्वचा लाल पडून काळवंडली जाण्याची शक्यता अधिक असते.