News

भाजीवाल्या ठोंबरे मावशीचा मुलगा सीए झाला; थेट आनंद महिंद्रानी घेतली दखल!

सध्या एका बातमीची चांगलीच चर्चा सुरू आहे. एका भाजीपाला विक्रेत्या महिलेचा मुलगा सीए (चार्टर्ड अकांऊटंट) झाल्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा होतेय. नुकताच सीएचा निकाल जाहीर झाला असून हा मुलगा चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालाय. त्याच्या या यशाची दखल खुद्द आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी देखील घेतली असून त्याच्याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे.

ठाण्यातील डोंबिवली (पूर्व) येथील एका भाजीविक्रेत्या महिलेचा मुलगा योगेश ठोंबरे नुकताच सीएची परीक्षा उतीर्ण झाला आहे. 11 जूलै रोजी सीए इंटर आणि फायनल परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. यावेळी योगेशने चांगले गुण पटकावले आहेत. त्यानंतर त्याचा आपल्या आईला तिच्या भाजीपाल्याच्या ठेल्याच्या ठिकाणी भेटत असतानाचा व्हीडीओ पब्लिश झालाय. हाच व्हीडीओ आनंद महिंद्रा यांनी शेअर करत या मुलाच्या यशाच कौतुक केलंय.

महिंद्रानी हा व्हिडीओ शेअर करत एका ओळीत कॅप्शनमध्ये लिहिलयं की, \’\’‘या व्हिडीओमुळे माझा दिवस खास झाला.\’\’ सध्या त्यांच्या पोस्टवरही चाहत्यांच्या कमेंट्स येताना दिसत आहेत. तसेच या मुलाचं सर्वच स्तरातून कौतुक केल जातय. त्यात आनंद महिंद्रा सारख्या दिग्गजांनी दखल घेतल्यानं यात आणखी भर पडलीय.

नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

महिंद्रानी पोस्ट शेअर करताच, नेटिझन्सनी त्यांच्या प्रतिक्रिया पोस्ट केल्या आहेत. “त्याला कामावर घ्या. काही उदाहरण ठेवा सर!” एका युझरने लिहिले तर दुसऱ्याने कमेंट केली, “थार मार्गावर आहे.” एका युझरने आश्चर्य व्यक्त केले की, “बॉलिवूडने याविषयी चित्रपट बनवण्यासाठी किती वेळ घेईल, तर दुसऱ्याने टिप्पणी केली, “जेव्हा आशा सत्यात उतरते तेव्हा असे होते!”

महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील केलं योगेशचं कौतुक

महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील योगेशचा हा व्हिडिओ ऑनलाइन शेअर केलेला दिसत आहे. “योगेश, तुझा अभिमान आहे,” असे लिहीत चव्हाण यांनी आपल्या पोस्ट मध्ये, डोंबिवली पूर्व येथील गांधीनगर मधील गिरनार मिठाई दुकानाजवळ भाजी विकणाऱ्या ठोंबरे मावशींचा मुलगा योगेश चार्टर्ड अकाऊंटंट (C.A.) झाला. निश्चय, मेहनत आणि परिश्रमांच्या बळावर योगेशने खडतर परिस्थितीशी तोंड देत हे दैदीप्यमान यश मिळवलं आहे. त्याच्या या यशामुळे आलेले मावशींचे आनंदाश्रू लाखमोलाचे आहेत. C.A. सारखी अवघड परीक्षा पास करणाऱ्या योगेशचे कौतुक करावे तितके कमीच. योगेशच्या या यशाबद्दल एक डोंबिवलीकर म्हणून आनंद झाला. योगेश, तुझं खूप खूप अभिनंदन ! पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

Back to top button