Tuesday, September 26, 2023
HomeCareerठाणे महापालिकेत 880 पदांची भरती; राज्य शासनाने काढला अध्यादेश | Thane Mahangarpalika...

ठाणे महापालिकेत 880 पदांची भरती; राज्य शासनाने काढला अध्यादेश | Thane Mahangarpalika Recruitment 2023

ठाणे | वाढत्या लोकसंख्येमुळे ठाणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील वाढलेला ताण कमी करण्यासाठी आकृतीबंधला मंजुरी देण्यापाठोपाठ राज्य शासनाने आता आकृतीबंधमधील पद भरतीच्या नियमावलीस मंजुरी दिली आहे. यासंबंधीचा अध्यादेश राज्य शासनाने काढला असून यामुळे ठाणे महापालिकेतील 880 वाढीव पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. (Thane Mahangarpalika Recruitment 2023)

ठाणे पालिकेतील वाढीव पदांच्या आकृतिबंधाला राज्‍य शासनाकडून पूर्वीच मंजुरी देण्यात आली होती; मात्र त्यातील पदांच्या भरतीची नियमावली ठरलेली नव्हती. यामुळे ठाणे महापालिकेत गेले वर्षभर वाढीव पदांची भरती होऊ शकली नव्हती. मात्र आता या पदांच्या भरती नियमावलीस राज्य शासनाने मंजुरी दिली असून त्यासंदर्भातील अध्यादेश काढण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे पालिकेत लवकरच 880 पदांच्या भरती केली जाणार आहे. (Thane Mahangarpalika Recruitment 2023)

ठाणे महापालिकेची स्थापना 1982 मध्ये झाली असून ही ‘ब’ वर्ग महापालिका आहे. सद्य:स्थितीत महापालिकेचे 9 प्रभाग असून, पालिकेचे एकूण क्षेत्रफळ 147 चौ. कि. मी. एवढे आहे. (Thane Mahangarpalika Recruitment 2023)

201 च्या जनगणनेनुसार ठाणे महापालिकेची लोकसंख्या 18 लाख 41 हजार इतकी आहे. गेल्या 12 वर्षात पालिकेच्या लोकसंख्येत मोठी वाढ झाली असून ही लोकसंख्या आता 24 लाखांच्या पुढे गेली आहे.

वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मात्र ठाणे महापालिकेत वाढीव पदांना मंजुरी मिळाली नव्हती. यामुळे ठाणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला होता. तो कमी करण्यासाठी ठाणे महापालिकेने 880 वाढीव पदांचा आकृतीबंध तयार केला होता. त्यास राज्याच्या नगरविकास विभागाने गेल्यावर्षी मंजुरी दिली होती.

वाढीव पदांच्या आकृतीबंधला मंजुरी मिळाली असली तरी त्यातील पदांच्या भरतीची नियमावली ठरलेली नव्हती. यामुळे ठाणे महापालिकेत गेले वर्षभर वाढीव पदांची भरती होऊ शकली नव्हती. दरम्यान, या पदांच्या भरती नियमावलीस राज्य शासनाने मंजुरी दिली असून त्याचा अध्यादेश काढला आहे.

यामध्ये सेवा प्रवेश आणि सेवांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. महापालिकेच्या कोट्यातून आणि राज्य शासनाच्या कोट्यातून कोणती किती पदे भरायची, त्याचे नियम आणि निकष ठरवून देण्यात आले आहेत. ठाणे महापालिकेत शिक्षण मंडळासह 9088 तर परिवहन सेवेत दोन हजार सहाशे कर्मचारी आहेत. तसेच सुमारे अडीच हजार कंत्राटी कामगार आहेत. राज्य शासनाने आकृतीबंधमधील पद भरतीच्या नियमावलीस मंजुरी दिली असून यामुळे 880 वाढीव पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular