ठाणे | ठाणे आरोग्य विभागातील भरती (Thane Arogya Vibhag Bharti 2023) प्रक्रियेला वेग आल्याचे पहायला मिळत आहे. या विभागाची नोकरभरती अंतिम टप्प्यात आली असून तब्बल 12 हजार जागांसाठीच्या भरतीची जाहिरात ललकरच येणार आहे.
ठाणे आरोग्य विभागात होणारी हि भरती (Thane Arogya Vibhag Bharti 2023) एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांचा निवड प्रक्रियेतून होणार आहे. 11903 जागांसाठी ‘क’ आणि ‘ड’ विभागात ही भरती केली जाणार आहे.
आरोग्य भरतीची जाहिरात पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. या मध्ये क गटामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, परिचारिका, लिपिक, टंकलेखन विभाग, वाहनचालक या विभागासाठी जाहिरात निघणार आहे. तर ‘ड’ गटामध्ये कामगार, शिपाई कामगार, कक्ष सेवक या पदांचा समावेश असणार आहे.
आरोग्य विभागामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ पदे रिकामी असल्यामुळे त्याचा भार कनिष्ठ पदावर असलेल्या अधिकाऱ्यांवर पडत आहे. त्यामुळे कनिष्ठ अधिकाऱ्यात नाराजी आहे.