मुंबई | देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. इंडियन टेरिटोरियल आर्मी म्हणजेच भारतीय प्रादेशिक सेनेने ऑफिसर पदांच्या भरतीसाठी (Territorial Army Recruitment 2023) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 19 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे.
Territorial Army Recruitment 2023
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 42 वर्षांच्या दरम्यान असावी. तसेच उमेदवार हा सर्व बाबतीत शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.
इंडियन टेरिटोरियल आर्मीच्या Territorial Army Officers पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 42 वर्षांच्या दरम्यान असावी. म्हणजेच, 21 नोव्हेंबर 2023 पर्यंत उमेदवाराने वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली असावी व 21 नोव्हेंबर 2023 रोजी उमेदवारचे वय 42 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
महत्त्वाच्या तारखा –
ऑनलाइन अर्ज : 23 ऑक्टोबर2023 (सकाळी 10 वाजल्यापासून) ते 21 नोव्हेंबर 2023 (रात्री 11 वाजून 55 मिनिटांपर्यंत)
ऑनलाइन प्रवेश परीक्षा : डिसेंबर महिन्याच्या 3 र्या किंवा 4 थ्या आठवड्यात (ही तारीख अंदाजे असून, अचूक तारीख अधिकृत वेबसाइटवर प्रदर्शित केली जाईल)
निवड प्रक्रिया –
इंडियन टेरिटोरियल आर्मीच्या Territorial Army Officers पदासाठी अर्ज करणार्या उमेदवारांची निवड परीक्षा आणि नंतर मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. सदर परीक्षा ही CBT (Computer Based Test) असणार आहे. सदर भरतीसाठी अर्ज करणार्या उमेदवाराची एकूण 100 गुणांची परीक्षा होणार असून, ही परीक्षा 2 तासांची असणार आहे. Reasoning, Elementary Mathematics, General Knowledge आणि English अशा चार विभागांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
PDF जाहिरात – Territorial Army Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – Territorial Army Application