Saturday, September 23, 2023
HomeCareerTCS अंतर्गत फ्रेशर्स पदवीधरांना नोकरीची संधी; मुलाखतींचे आयोजन, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

TCS अंतर्गत फ्रेशर्स पदवीधरांना नोकरीची संधी; मुलाखतींचे आयोजन, जाणून घ्या संपूर्ण माहिती | TCS Recruitment 2023

पुणे | टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही IT सेवा, डिजिटल आणि बिझनेस सोल्यूशन्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. कंपनीला त्यांच्या महाराष्ट्रातील कार्यालयांसाठी उमेदवारांची गरज असून पदवीधरांना नोकरी मिळणार आहे. (TCS Recruitment 2023)

यासाठी TCS ने वॉक-इन मुलाखतींचे आयोजन केले असून 24 जून 2023 रोजी या मुलाखती पार पडतील. पदवीधर एंट्री लेव्हल रोलसाठी ही भरती केली जाणार असून भारतातील पदवीधरांसाठी खुली आहे. (TCS Recruitment 2023)

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी डॉ. डीवाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी, संत तुकाराम नगर, एचए कॉलनी, पुणे, महाराष्ट्र 411018 या पत्त्यावर मुलाखतीसाठी सकाळी 9 ते 11 या वेळेत हजर राहायचे आहे. (TCS Recruitment 2023)

शैक्षणिक पात्रता

B.Com, BA, BBA, BMS, BBM, B.Sc, BCA- 2021 आणि 2022 मधील पूर्ण-वेळ पदवीधर यासाठी पात्र असून ही संधी फक्त पदवीधर फ्रेशर्ससाठी आहे, पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी यासाठी पात्र नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

आवश्यक गोष्टी

TCS नोकरीसाठी अर्ज फॉर्म (अनिवार्य), अपडेटेड रेझ्युमे, सरकारी आयडी पुरावा, 1 पासपोर्ट आकाराचा फोटो, सर्व शैक्षणिक कागदपत्रे. (मूळ आणि झेरॉक्स संच)

इच्छुक विद्यार्थ्यांनी बीपीएस श्रेणी अंतर्गत पुढील चरण पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे : https://lnkd.in/d8NabWbV किंवा https://nextstep.tcs.com/campus/#/ वर लॉग इन करा आणि DT क्रमांक तयार करा आणि BPS श्रेणी अंतर्गत अर्ज भरा.

पायरी 1: https://ibegin.tcs.com/iBegin/ ला भेट द्या
पायरी 2: लॉग इन करण्यासाठी क्लिक करा
पायरी 3: नवीन वापरकर्ता क्लिक करा (आमच्यासोबत नोंदणी करा)
पायरी 4: स्वारस्य असलेल्या भागात “” निवडा आणि नोंदणी पूर्ण करा. (तपशील भरा)
पायरी 5: एकदा पूर्ण झाल्यावर तुमचा TCS क्र. व्युत्पन्न केले जाईल जे EP2023XXXX पासून सुरू होईल.
पायरी 6: तुम्हाला तुमच्या वैयक्तिक ई-मेल आयडीवर EP क्रमांक प्राप्त होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular