मुंबई | देशातील दिग्गज आयटी कंपनी IT शिक्षण घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी देणार आहे. TCS कडून तब्बल 40 हजार उमेदवारांची भरती (TCS Recruitment 2023-24) केली जाणार असल्याचे कंपनीचे सीओओ एन गणपती सुब्रमण्यम यांनी स्पष्ट केले आहे. आर्थिक वर्ष 2024 साठी ही भरती केली जाणार आहे.
TCS Recruitment 2023-24
टीसीएस 40 हजार प्रशिक्षणार्थी भरती करणार आहे. सध्या आयटी क्षेत्रातील बहुतेक कंपन्या रिक्त पदांवर नवीन भरती करीत नाहीत. त्यामुळेच टीसीएसने उचललेले हे पाऊल महत्वाचे मानले जात आहे. विशेष म्हणजे चौथ्या तिमाहीचे निकाल आल्यानंतर कंपनीने याबाबत माहिती दिली आहे.
TCS मध्ये सध्या किती कर्मचारी?
TCS मधील एकूण कर्मचाऱ्यांबद्दल बोलायचे झाल्यास सध्या कंपनीत 6,14,795 लोक काम करत आहेत. याशिवाय सीओओ एन गणपती सुब्रमण्यम यांनी सांगितले की, सुमारे 10 टक्के म्हणजेच 60 हजार विद्यार्थी प्रशिक्षणार्थी आहेत. येत्या काळात म्हणजे एका वर्षात ते देखील कंपनीचा भाग बनतील.
TCS ची चमकदार कामगिरी
गेल्या महिन्यात TCS कंपनीने सांगितले होते की, गेल्या काही वर्षांपासून आम्ही 0-3 वर्षांचा अनुभव असलेल्या लोकांना कामावर घेत आहोत. तर यावेळी आम्ही फ्रेशर्ससाठी भरती सुरू केली आहे. कंपनीच्या सप्टेंबर तिमाहीच्या निकालांबद्दल बोलायचे झाल्यास निव्वळ नफा 11,342 कोटी रुपये होता.
Infosys मध्ये नवीन भरतीची सध्या शक्यता नाही
याउलट Infosys बद्दल बोलायचे झाल्यास कंपनीचे CFO निलांजन रॉय म्हणतात की, आम्ही गेल्या वर्षी 50 हजार नवीन भरती केली होती, त्यामुळे या वर्षासाठी कंपनीची नव्या नोकऱ्यांची भरती करण्यासंदर्भात कोणतीही योजना नाही. अशा परिस्थितीत टीसीएसची ही भरती प्रक्रिया खूप मोठी मानली जात आहे.