Saturday, September 23, 2023
HomeCareerTCS मध्ये 'जॉब घोटाळा', नोकऱ्यांच्या मोबदल्यात १०० कोटीचं कमिशन? | TCS Job...

TCS मध्ये ‘जॉब घोटाळा’, नोकऱ्यांच्या मोबदल्यात १०० कोटीचं कमिशन? | TCS Job Scandal

मुंबई | देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या TCS अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये करोडो रूपयांचा नोकरी घोटाळा (TCS Job Scandal) उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. सरकारी क्षेत्रात नोकर भरतीत घोटाळ्याचे प्रकार आपलाल्या नवीन नाहीत, मात्र खाजगी कंपनीत देखील अशा प्रकारे नोकरीच्या बदल्यात कमिशनचा हा घोटाळा नक्कीच धक्कादायक असल्याचे बोलले जात आहे.

लाइव्ह मिंटने दिलेल्या बातमीनुसार, सर्वात मोठ्या आयटी कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात काही बड्या अधिकाऱ्यांनी कन्सल्टन्सी स्टाफिंग फर्मकडून मोठं कमिशन घेतले आहे. हा संपूर्ण भाग एका व्हिसलब्लोअरने उघड केला आहे, ज्याने या प्रकरणाची माहिती TCS च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली आहे. टीसीएसच्या रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुपचे (आरएमजी) जागतिक प्रमुख ईएस चक्रवर्ती अनेक वर्षांपासून कर्मचारी कंपन्यांकडून त्यांना कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात कमिशन घेत असल्याचा आरोप (TCS Job Scandal) व्हिसलब्लोअरने केला आहे.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर TCS ने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन उच्च अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली, ज्यामध्ये मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी अजित मेनन यांचाही समावेश होता. आठवडा भराच्या तपासानंतर टीसीएसने चक्रवर्ती यांना रजेवर पाठवले आणि रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुपच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित केले. याशिवाय आयटी कंपनीने कर्मचारी भरती करणाऱ्या तीन कंपन्यांनाही काळ्या यादीत टाकले आहे.

ईएस चक्रवर्ती १९९७ पासून TCS मध्ये कार्यरत होते. ते थेट मुख्य कार्यकारी अधिकारी नटराजन गणपती सुब्रमण्यम यांना रिपोर्ट करत होते. रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुपचे कार्यकारी अरुण जीके यांच्यावरही कारवाई करण्यात आली असून, त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. या दोघांशिवाय ज्या अधिकाऱ्यांवर टीसीएसने कारवाई केली, त्यांची नावे अद्याप समजलेली नाहीत. तसेच काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या तीन कर्मचाऱ्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.

१०० कोटींच्या घोटाळ्याची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार, टीसीएसमध्ये नोकरी मिळवण्याच्या बदल्यात हा भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात झाला हे सांगता येणं सध्या कठीण आहे, परंतु असे मानले जाते की, यातील लोकांनी किमान १०० कोटी रुपये कमिशन घेतले आहेत. खरं तर RMG विभाग दररोज नवीन भरतीसह सुमारे १४०० अभियंत्यांना विविध प्रकल्पांवर नियुक्त करतो. याचा अर्थ TCS चा RMG विभाग दर मिनिटाला नवीन प्लेसमेंट करतो, यावरूनच घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे बोलले जात आहे.

TCS मध्ये गेल्या ३ वर्षांत ३ लाख कर्मचाऱ्यांची भरती

टाटा समूहाची IT कंपनी TCS ही भारतीय कॉर्पोरेट जगतात सर्वाधिक नोकऱ्या उपलब्ध करून देते. २०२२ च्या अखेरीस TCS च्या कर्मचाऱ्यांची संख्या ६.१५ लाख होती. गेल्या ३ वर्षांत कंपनीने सुमारे ३ लाख कर्मचारी भरती केले आहेत आणि यापैकी ५० हजार लोकांना अलीकडच्या काही महिन्यांत नियुक्त करण्यात आले आहे. TCS सह जवळजवळ सर्व मोठ्या आयटी कंपन्या कर्मचारी फर्मद्वारे भरती करतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular