Tata Project Job : 400 पदवीधरांना मिळणार जॉब; फ्रेशर्सना संधी

मुंबई | जगभरात अनेक मोठ्या कंपन्या मंदीसदृश्य परिस्थितीमुळे कर्मचारी कपात करत आहेत. अशा परिस्थितीत टाटा समूह मात्र नवीन लोकांना नोकरीची संधी देत आहे. टाटा समूहाची Engineering Procurement & Construction (EPC) शाखा असलेल्या Tata Projects या वर्षी देशातील आघाडीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना नोकरीची मोठी संधी देणार आहे. (Tata Project Job)

टाटा प्रोजेक्ट्सचे (Tata Projects) मुख्य एचआर अधिकारी गणेश चंदन यांनी इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, टाटा प्रोजेक्ट्स (Tata Projects) 2022-23 मध्ये सुमारे 400 नवीन पदवीधरांना नोकरीची संधी देणार आहे. या नियुक्त्यांमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) मधील 255 पदवीधर असतील. डिप्लोमाधारकांना इतर सरकारी पॉलिटेक्निक महाविद्यालयांमधून नोकरीची संधी देण्यात येणार आहे. टाटा ग्रुपने 2021-22 मध्ये टाटा प्रोजेक्टद्वारे 250 पदवीधरांची भरती केली होती. ज्यामध्ये IIT आणि NIT मधील सुमारे 80 पदवीधरांना संधी मिळाली होती.

गणेश चंदन यांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा प्रोजेक्ट (Tata Projects Freshers Hiring) कंपनी अभियांत्रिकी कॅम्पसच्या माध्यमातून नवीन टॅलेंटला संधी देत आहेत. गेल्या पाच वर्षांत कंपनीने 1,000 पदवीधर अभियंते आणि विज्ञान पदवीधरांना 5,700 कायमस्वरूपी कामावर रुजू केलं आहे. याबाबत माहिती देताना ते म्हणाले आहेत की, आम्हाला देशांतर्गत प्रतिभा वाढवायची आहे. कॅम्पसमध्ये भरती करणारे बहुतेक अभियंते मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल शाखांमधील आहेत. चंदन यांच्या  म्हणण्यानुसार, कंपनी प्रीमियर इन्स्टिट्यूटमधील नवीन अभियंत्यांना दरवर्षी सुमारे 17 लाख रुपये देते.

यामध्येच दरवर्षी कंपनी अभियांत्रिकी संस्थांमधून महिलांचीही नियुक्ती करत आहे आणि यावर्षी त्यांची संख्या सुमारे 25 टक्के आहे. कंपनीत पाच वर्षांपूर्वी सुमारे 4,000 कर्मचार्‍यांमध्ये महिलांचा वाटा 3 टक्के होता. हे प्रमाण आता 8 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. येत्या दोन वर्षांत 12 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. येत्या काही वर्षांमध्ये 50 टक्के महिलांना नोकरी देण्याचा कंपनीचा मानस आहे.

टाटा प्रोजेक्ट्स (Tata Projects Freshers Hiring) बहुतेक विद्यार्थ्यांना एनआयटी (NIT) केंद्रांवरून वारंगल, कालिकत, सुरथकल, सिलचर आणि सुरतमधून कामावर घेतात. तर पदवीधरांना कंपनी मुंबई, मद्रास, कानपूर, खरगपूर, रुरकी आणि BHU मधून नोकरीची संधी देते. कंपनी नोकरीसाठी कॅम्पस भेटी देत ​​आहे. टाटा समूह तमिळनाडूतील होसूर प्लांटमध्ये अॅपल आयफोन उत्पादनासाठी 45,000 कामगारांची नियुक्ती करणार आहे. तर गेल्या सप्टेंबरमध्ये पाच हजार कामगारांना कामावर घेण्यात आले आहे.