Tuesday, September 26, 2023
HomeNewsतलाठी भरती परीक्षेला पहिल्याच दिवशी गालबोट, पेपर फुटला | Talathi Bharti Exam...

तलाठी भरती परीक्षेला पहिल्याच दिवशी गालबोट, पेपर फुटला | Talathi Bharti Exam 2023

नाशिक | राज्यातील सरकारी नोकरीच्या विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. आता नाशिकमध्ये गुरूवारी घेण्यात आलेल्या तलाठी परिक्षेत (Talathi Bharti Exam 2023) देखील गैरप्रकार झाल्याचे आढळून आले. याप्रकरणी म्हसरूळ परिसरातील केंद्राबाहेरून एका तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तलाठी भरतीच्या ऑनलाईन परीक्षेत पहिल्याच दिवशी हा गैरप्रकार झाल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. ताब्यात घेतलेल्या तरूणाकडून पोलिसांनी वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन, टॅब आणि हेडफोन जप्त केला आहे. 

राज्यातल्या विविध ठिकाणी तलाठी भरतीसाठी परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. नाशिकमधील म्हसरूळ या ठिकाणी या परीक्षेमध्ये गैरप्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. एका मोबाईलमध्ये काही संगणकावरील प्रश्नपत्रिकेचे फोटोही आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे झाला आहे. 

घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी एका तरूणाला अटक केली असून यामागे एखादे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संशयिताचे कोणी साथीदार आहेत का याचाही तपास सुरू आहे.

सदरचा संशयित हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असून परीक्षा केंद्रात तो कोणाला मदत करत होता? त्याचे अजून कोणी साथीदार आहेत का? अशाप्रकारे काम करणारे एखादे रॅकेट कार्यरत आहे का? याचा पोलिसांकडून शोध सध्या सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular