मुंबई | राज्यात सुरू असलेल्या तलाठी भरतीच्या (Talathi Bharti Exam 2023) परिक्षेत आज तांत्रिक कारणाने गोंधळ झाल्याचे पहायला मिळाले. आज दि. 21 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत होणारा तलाठी भरतीचा परिक्षा पेपर टीसीएस कंपनीच्या डेटा सेंटर मधील तांत्रिक बिघाडामुळे उशिरा म्हणजे 11 वाजता सुरू करण्यात आला.
राज्यातील सर्वच्या सर्व 115 सेंटरवर हा तांत्रिक घोळ निर्माण झाल्याने सदरचा पेपर उशिरा सुरू झाल्याने आज होणाऱ्या सर्व तिन्ही सत्रातील परिक्षा प्रत्येकी दोन तास उशिरा सुरू होणार आहेत. बदलेल्या वेळापत्रकाची उमेदवारांनी नोंद घेण्याची सूचना खालील निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
