महत्वाची अपडेट: तलाठी पदांची भरती; २४७१ पदे रिक्त! Talathi Bharti 2025
मुंबई | राज्याच्या महसूल विभागात सुमारे ३ हजार पदे रिक्त आहेत. यामध्ये सर्वाधिक रिक्त पदे तलाठ्यांची (Talathi Bharti 2025) असल्याने सद्यस्थितीत एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे. प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस तलाठी जातो. अनेकदा एखाद्या गावात तलाठी १५ दिवसातून एकदाच येतात. यामुळे शेतकऱ्यांना चावडीच्या पायऱ्या किमान चार- वेळा तरी चढाव्याच लागतात. तलाठ्यांचा भार हा अनेकदा कोतवालावरदेखील पडतो.
राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या तलाठ्यांची जवळपास २४७१ पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत असणाऱ्या तलाठ्यांवरील भार कधी कमी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महसूल विभागात राज्यात सर्वाधिक महसूल वसूल करण्यात तलाठी ‘क’ वर्गाचा क्रमांक पहिला आहे. प्रत्येक गावात चावडीवर तलाठी कार्यालय असले तरी तिथे तलाठी असेलच असे नाही. कारण एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे.
सातबारा, शेतसारा वसुली करणे, गारपीट पंचनामे करणे, नैसर्गिक आपत्ती, निवडणुकीची सर्व कामे ही तलाठ्यांच पार पाडावी लागतात. तलाठ्याना गावपातळीवरील मूळ कामे पूर्ण करणे कठीण जात असताना इतरही कामांचा भार त्यांच्या खांद्यावर दिला जातो. सहा महिन्यांपूर्वी काही तलाठी पदे भरण्यात आली, मात्र रिक्त पदे पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय तलाठ्यांवरील भार कमी होणार नाही. त्यामुळेच सरकारी पातळीवर तलाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्हानिहाय रिक्त पदांची संख्या – Talathi Bharti 2025
अकोला | 48 |
अमरावती | 78 |
कोल्हापूर | 56 |
गहत्चिरोली | 140 |
गांदिया | 717 |
चंद्रपूर | 151 |
जळगाव | 249 |
जालना | 122 |
ठाणे | 81 |
धाराशिव | 110 |
धुळे | 205 |
नंदुरबार | 54 |
नगर | 255 |
नांदेड | 135 |
नागपूर | 186 |
नाशिक | 274 |
परभणी | 15 |
पालघर | 243 |
पुणे | 3855 |
बीड | 913 |
बुलढाणा | 53 |
भंडारा | 67 |
मुंबई उपनगर | 41 |
मुंबई शहर | 17 |
यवतमाळ | 142 |
रत्नागिरी | 210 |
रायगड | 220 |
लातूर | 55 |
वर्धा | 84 |
वाशिम | 26 |
संभाजीनगर | 154 |
सांगली | 110 |
सातारा | 156 |
सिंधुदुर्ग | 145 |
सोलापूर | 200 |
हिंगोली | 76 |