Talathi Bharti नवीन अपडेट; राज्यात तलाठी पदांसाठी मेगाभरती; शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर

मुंबई | महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी पदासाठीच्या तब्बल 4122 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. आता या भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या भरतीसाठी रजिस्ट्रेशन लवकरच सुरु होणार आहेत. 

तलाठी भरती संदर्भात शासन निर्णय जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाच्या मागण्यांसंदर्भात अभ्यास करुन शासनांस व्यवहार्य व अभ्यासपूर्ण शिफारसी करण्यासाठी नागपूर अन्वये विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. राज्यात तलाठी (Talathi Bharti) सज्जे व मंडळ कार्यालयांसाठी पद भरतीला शासन मान्यता देण्यात आली आहे.

महसूल विभागातील तलाठी भरती तलाठी आणि क्लार्क पदांसाठी होत आहे. तलाठी पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीचे शिक्षण पुर्ण केलेले असणे आवश्यक आहे, तर क्लार्क पदासाठी उमेदवार १० वी उत्तीर्ण तसेच एमएससीआयटी प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक आहे.

तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

 • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केलेल्या असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक आहे. SC/ST/PWD/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी शिथिलता देण्यात येणार आहे.
इतका मिळणार पगार  - निवड झालेल्या उमेदवरांना (Talathi)- 5,200/- ते रु. 20,200/-.रुपये प्रतिमहिना

अशा पद्धतीनं करा अर्ज –

 • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जदाराचे स्वतःचे gmail account आवश्यक आहे.
 • अर्ज योग्यरीत्या भरून झाल्यावर submit हे बटन क्लिक करावे.
 • अर्जाची प्रत आपल्या gmail account वर प्राप्त होईल
 • सदर अर्ज प्रिंट करून मुलाखतीच्या दिवशी प्रिंट केलेल्या अर्जा सह उपस्थित असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रंॉ
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – जानेवारी 2023
अधिक माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – क्लिक करा
या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  https://rfd.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

 • नागपूर महसूली विभागाअंतर्गत येणाऱ्या नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्याअंतर्गत तलाठीच्या ४७८ तर महसूल अधिकारींच्या एकूण ८० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
 • औरंगाबाद महसूल विभागाअंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, परभरणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये तलाठीच्या एकूण ६८५ तर महसूल अधिकारींच्या ११४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
 • नाशिक महसूल विभागाअंतर्गत नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर येथे तलाठीची ६८९ पदे तर महसूल मंडळाच्या ११५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
 • कोकण जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे तलाठी पदांच्या एकूण ५५० तर महसूल मंडळाच्या एकूण ९१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
 • शासनाची अधिकृत वेबसाइट www.maharashtra.gov.in वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.