नामांकित विद्यापीठ किंवा कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. त्यात एखाद्या परदेशी विद्यापीठातील कोर्स करायचा झाल्यास ही फी कितीतरी लाखात असते. प्रत्येक विद्यार्थ्याला इतके पैसे भरणे शक्य नसते.
गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांची ही अडचण जगात प्रसिद्ध व अव्वल स्थानावर असलेल्या काही विद्यापिठांनी दूर केली आहे. (Foreign University Free Course)
Stanford University Free Course
जगातील तिसऱ्या क्रमांकावर असलेले स्टॅनफोर्ड विद्यापीठ होतकरु विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफत कोर्स पूर्ण करण्याची संधी देत आहे. या माध्यमातून विद्यार्थांना ‘सायबर सिक्युरिटी’ कोर्स अगदी मोफत पूर्ण करता येणार आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठ सायबर सिक्युरिटीमध्ये अनेक ऑनलाईन प्रोग्राम ऑफर करत असून या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान तसेच संगणक प्रणालीच्या सुरक्षेच्या मूलभूत गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. यासोबतच Cyber Attacks कसे टाळावे आणि इतरांचे संरक्षण कसे करावे इत्यादी बद्दल शिकवले जाणार आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाने ऑफर केलेला हा ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्णपणे मोफत असून, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र देखील दिले जात आहे.
स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून सायबर सिक्युरिटीवर अनेक अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जात आहेत. यामध्ये दोन तासांपासून आठ – दहा तासांपर्यंतच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यार्थी आपली वेळ आणि गरज यानुसार अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमातील विषय आणि प्रवेश याबाबतची सविस्तर माहिती स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या https://online.stanford.edu/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाने विविध विषयांवरील तब्बल 582 ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध करून दिले असून यातील अनेक कोर्सेस अगदी मोफत आहेत, तर काही कोर्सेससाठी मात्र शुल्क आकारले जाते.
सायबर सुरक्षा कोर्स करणाऱ्यांना किती मिळतो पगार?
‘सायबर सिक्युरिटी’ कोर्स केल्यानंतर विद्यार्थांना सायबर सुरक्षा तज्ञ म्हणून नोकरी मिळते. या नोकरीसाठी महिन्याला लाखोंच्या घरात पगार मिळतो. जर आपण भारताचाच विचार केला तर चार ते नऊ वर्षाचा अनुभव असलेल्या सायबर सुरक्षा तज्ज्ञांचा वर्षाला कमीत कमी 12 ते 20 लाख किंवा त्याहून अधिक पगार मिळतो. याचाच अर्थ महिन्याला किमान एक लाख रुपये पर्यंत पगार मिळू शकतो. या क्षेत्रात जर दहा ते वीस वर्षे कामाचा अनुभव असेल तर अशा सायबर सुरक्षा तज्ञांचा वार्षिक पगार हा 22 ते 25 लाख रुपये इतका किंवा त्यापेक्षा अधिक असू शकतो.