अंतिम तारीख – लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि अन्य 4500 पेक्षा अधिक पदांची भरती सुरु; सरकारी नोकरीची संधी चुकवू नका | SSC CHSL Recruitment

मुंबई | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक स्तरासाठीची (SSC CHSL Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. यावर्षी एकूण 4500 पदांवर भरती केली जाणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विभागांमध्ये नोकरी मिळवण्याची संधी आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2023 आहे.

या भरती अंतर्गत कर्मचारी निवड आयोग विविध मंत्रालये/विभाग/कार्यालयांमध्ये विविध विभागीय लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या नवीन भरती अंतर्गत SSC CHSL अधिसूचना 2022 PDF मध्ये पूर्ण माहिती –  वयोमर्यादा, पात्रता, निवड प्रक्रिया इत्यादी तपशील दिलेला आहे.

रिक्त पदाचे नाव
1) कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) 4500
2) डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
3) डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’

शैक्षणिक पात्रता: (Qualification)
उमेदवार 12वी उत्तीर्ण 

वयाची अट : 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 27 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 100 रुपये/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

इतका पगार मिळेल?
कनिष्ठ विभाग लिपिक : पे लेवल-2 (19,900-63,200 रुपये).
डेटा एंट्री ऑपरेटर: पे लेवल-4 (25,500-81,100 रुपये) और लेवल-5 (29,200-92,300 रुपये).
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’’: पे लेवल -4 (25,500-81,100 रुपये).

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जानेवारी 2023 (11:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : ssc.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लिक करा

SSC CHSL (10+2) परीक्षेत लोअर डिव्हिजन क्लर्क, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक, वर्गीकरण सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदांचा समावेश आहे. SSC संगणक-आधारित चाचणी, वर्णनात्मक पेपर आणि कौशल्य चाचणी किंवा टायपिंग चाचणीद्वारे सहाय्यक / लिपिक पदांसाठी उमेदवारांची निवड करेल. एसएससी सीएचएसएल परीक्षा 3 टप्प्यात घेतली जाते (टियर्स). पहिली परीक्षा ऑनलाइन असली तरी नंतरची दोन ऑफलाइन परीक्षा आहेत. नोंदणी आणि संप्रेषणाची संपूर्ण प्रक्रिया SSC CHSL च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन होते. अंतिम निवड होण्यापूर्वी उमेदवारांनी पुढील टप्प्यात जाण्यासाठी SSC CHSL परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यासाठी पात्र असणे आवश्यक आहे. SSC ने सर्व SSC परीक्षांसाठी SSC कॅलेंडर 2022 जारी केले आहे.