Saturday, September 23, 2023
HomeCareerपदवीधरांना मोठी संधी, 4425 रिक्त जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कडून भरती; लाखो रूपये...

पदवीधरांना मोठी संधी, 4425 रिक्त जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कडून भरती; लाखो रूपये पगार

मुंबई | कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार 4425 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. (Staff Selection Commission Recruitment)

स्टाफ सिलेक्शन कमिशनव्दारे होणारी ही भरती वेगवेगळ्या विभागांसाठी केली जाणार आहे. यामध्ये SSC Junior Engineer, Stenographer Grade ‘C’ & ‘D’ तसेच Sub-Inspector in Delhi Police and Central Armed Police Forces भरतीचा समावेश आहे.

यापैकी SSC Junior Engineer पदाच्या 1342 जागा, Stenographer पदाच्या 1207 जागा तर CPO पदाच्या 1876 जागांचा समावेश आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.

  1. SSC JE Bharti 2023 – या भरती अंतर्गत ‘कनिष्ठ अभियंता’ (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) पदांची भरती केली जाणार आहेत. याकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2023 आहे.
  2. स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी पदांच्या 1207 रिक्त जागा भरण्यात (SSC Stenographer Bharti 2023) येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2023 आहे.
  3. “केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) उपनिरीक्षक आणि दिल्ली पोलिस उपनिरीक्षक” पदांच्या एकूण 1876 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2023 आहे.

वरील पदांच्या भरतीची सविस्तर माहिती वेगवेगळ्या स्वरूपात खालील लिंकव्दारे उपलब्ध आहेत. यामध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी, वेतनश्रेणी इत्यादी माहितीचा सविस्तर तपशिल देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular