Sunday, September 24, 2023
HomeCareerस्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये 'ट्रान्सलेटर' पदासाठी मेगाभरती, अर्ज करण्याची शेवटची संधी |...

स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये ‘ट्रान्सलेटर’ पदासाठी मेगाभरती, अर्ज करण्याची शेवटची संधी | SSC Recruitment 2023 

मुंबई | केंद्र सरकारच्या कर्मचारी निवड आयोगामध्ये (एसएससी- staff selection commission) मध्ये मोठी भरती सुरु आहे. पदवी धारकांसाठी सरकारी नोकरीची ही चांगली संधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने याबाबत नुकतीच अधिसूचना जाहीर केली असून या अंतर्गत ट्रान्सलेटर पदांची भरती केली जाणार आहे.

कर्मचारी निवड आयोग अंतर्गत विविध पदांसाठी भरती (SSC Recruitment 2023) प्रक्रिया राबवली जात आहे. पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांत, विभागात, विविध संस्थामध्ये, कार्यालयामध्ये कनिष्ठ अनुवाद अधिकारी, कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ अनुवादक, वरिष्ठ हिंदी अनुवादक (नॉन-गॅझेटेड) पदांकरिता भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

वरील रिक्त पदांच्या 307 रिक्त जागा भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2023 आहे.

पदे आणि केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयात/कार्यालयात मिळणार जॉईनिंग
ज्युनियर ट्रान्सलेटर – सेंट्रल सेक्रेटरिएट ऑफिशियल लँग्वेज सव्‍‌र्हिस (CSOLS)
ज्युनियर ट्रान्सलेटर -रेल्वे बोर्ड
ज्युनियर ट्रान्सलेटर आम्र्ड फोर्सेस हेडक्वार्टर्स (AFHQ)
ज्युनियर ट्रान्सलेटर/ ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर – केंद्र सरकारचे सबऑर्डिनेट ऑफिस
सिनियर हिंदी ट्रान्सलेटर – केंद्र सरकारची विविध मंत्रालये/ खाती/ कार्यालये

  • अर्ज शुल्क –
    • Women/SC/ST/PWD/Ex – Nill
    • इतर उमेदवारांसाठी  – रु. 100/-

वेतन – ज्युनियर ट्रान्सलेटर/ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर या पदांसाठी पे-लेव्हल – 6 अंदाजे वेतन दरमहा 65 हजार रुपये.
सिनियर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी पे-लेव्हल- 7 अंदाजे वेतन दरमहा 81 हजार रुपये.

परीक्षा केंद्रे – अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, पणजी इ. ऑनलाइन अर्ज भरण्याची कार्यपद्धती स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या संकेतस्थळावरील जाहिरातीत Annexure- III/ Annexure- IV मध्ये दिलेली आहे.

PDF जाहिरातSSC Recruitment 2023 
ऑनलाईन अर्ज कराOnline Application
अधिकृत संकेतस्थळ : ssc.nic.in 


RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular