मुंबई | पदवीधरांना 1 लाख 12 हजार रूपये महिना पगाराच्या नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत ‘केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) उपनिरीक्षक आणि दिल्ली पोलिस उपनिरीक्षक’ पदांच्या एकूण 1876 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज आजपासून म्हणजेच 22 जुलै पासून सुरू होत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2023 आहे.
- अर्ज शुल्क – रु. 100/-
- महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) आरक्षणासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता – सर्व पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेची बॅचलर पदवी किंवा जे सध्या पदवीच्या शेवटच्या वर्षाला असून 15 ऑगस्ट 2023 पूर्वी आपले पदवीचे अंतिम कागदपत्र जमा करू शकतील असे उमेदवार.
PDF जाहिरात – SSC CPO Notification 2023
ऑनलाईन अर्ज करा – Staff Selection Commission CPO Application 2023