खुशखबर! SSC CHSL अंतर्गत होणार 3954 पदांची भरती, पदसंख्या वाढवली | SSC CHSL Bharti 2025
मुंबई | जर आपण SSC CHSL अंतर्गत अर्ज केला असेल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोग (एसएससी)च्या महत्त्वाच्या भरतींपैकी एक म्हणजे कंबाइंड हायर सेकंडरी लेव्हल (CHSL) परीक्षा 2024. या परीक्षेसाठी पदांची संख्या वाढली आहे. 8 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेत 3712 पदे होती, परंतु आता गुरुवारी जाहीर केलेल्या सुधारित अधिसूचनेत ही संख्या वाढून 3954 झाली आहे.
यामुळे केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, कार्यालये आणि विभागांमध्ये 242 नवीन पदांची भर पडली आहे. सीएचएसएल 2024 साठी 34,55,669 उमेदवारांनी अर्ज केले होते. या भरतीत लोअर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी) / ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (जेएसए), पोस्टल असिस्टेंट/सॉर्टिंग असिस्टेंट, आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते. 2023 साली 1762 पदांसाठी 32,17,442 उमेदवारांनी अर्ज केला होता, तर 2022 साली 4522 पदांसाठी 32,35,474 उमेदवारांनी अर्ज केले होते.
3954 पदांपैकी सर्वाधिक पदे संरक्षण मंत्रालयातील (सीमा रस्ता संघटना किंवा बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन) एलडीसी/जेएसएसाठी आहेत, जी संख्या 447 आहे. यामध्ये अनारक्षित वर्गासाठी 207, अनुसूचित जातीसाठी 58, अनुसूचित जमातीसाठी 37, ओबीसीसाठी 95, तर ईडब्ल्यूएससाठी 50 पदे राखीव आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या कॅन्टीन स्टोअर्स विभागात एलडीसी/जेएसएसाठी 272 पदे, संरक्षण लेखा महानियंत्रक कार्यालयात 238 पदे, परराष्ट्र मंत्रालयाच्या केंद्रीय पासपोर्ट संघटनेत ज्युनियर पासपोर्ट सहाय्यकासाठी 301 पदे, गृह मंत्रालयाच्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये एलडीसी/जेएसएसाठी 299 पदे, तर गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयात एलडीसी/जेएसएसाठी 249 पदे आहेत.