Sunday, September 24, 2023
HomeCareerSRTMUN अंतर्गत लिपिक, शिपाई, प्राध्यापक व इतर पदांची भरती; त्वरित अर्ज करा...

SRTMUN अंतर्गत लिपिक, शिपाई, प्राध्यापक व इतर पदांची भरती; त्वरित अर्ज करा | SRTMUN Recruitment 2023

नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे विविध रिक्त पदांसाठी भरती (SRTMUN Recruitment 2023) केली जाणार आहे. एकूण 32 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार असून यासाठीची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे.

SRTMUN Recruitment 2023 – ‘कनिष्ठ अभियंता, तांत्रिक सहाय्यक, उपकरण अभियंता, फार्मासिस्ट, परिचारिका, उत्पादन सहाय्यक, अधीक्षक मुलांचे वसतिगृह),अधीक्षक (मुलींचे वसतिगृह), ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा सहाय्यक, तंत्रज्ञ / प्रयोगशाळा सहाय्यक, सहायक निर्माता तांत्रिक, प्रयोगशाळा सहाय्यक (संगणक), प्रयोगशाळा परिचर, पशुगृह परिचर, लघुलेखक निम्न श्रेणी, कनिष्ठ लिपिक, शिपाई, संचालक, प्राचार्य, समन्वयक, सहायक प्राध्यापक’ या विविध पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2023 आहे.

वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्जदाराने दिलेल्या  लिंक वर ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र माहिती भरून त्याची प्रिन्ट विद्यापीठात सादर करावी. अन्यथा अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

अर्जदाराने अर्ज करते वेळी तो शिक्षण, अनुभव, जात प्रवर्ग (आरक्षण) वय या सर्व बाबीमध्ये पात्र असल्याची खात्री करूनच अर्ज करावा. अर्जासोबत कोणत्याही प्रमाणपत्राच्या मूळ प्रती जोडू नयेत, संबंधित प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.

अर्जदार सेवेत असल्यास सध्याच्या नियोक्त्यामार्फतच अर्ज पाठवावा. महिला उमेदवारांचे नांव बदलले असल्यास नाव बदलाबाबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती सोबत जोडाव्यात. अर्ज सादर केल्यानंतर कुठल्याही कागदपत्रांच्या / प्रमाणपत्रांच्या प्रती पाठवू नयेत, पाठविल्यास ती विचारात घेतली जाणार नाहीत.

PDF जाहिरात ISRTMUN Bharti 2023
PDF जाहिरात IISRTMUN Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा (नॉन टीचिंग)SRTMUN Application 2023
अधिकृत वेबसाईटwww.srtmun.ac.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular