सोलापूर | सोलापूर महानगरपालिकेचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या याचा विचार करता महानगरपालिकेत अनेक रिक्त जागा भरण्याची गरज आहे. सध्या महापालिकेच्या अग्निशमन विभागात देखील अनेक जागा रिक्त असून लवकरच त्यांची भरती केली जाणार आहे.
सोलापूर शहरात सध्या रविवार पेठ, भवानी पेठ, सावरकर मैदान, होटगी रोड व अक्कलकोट रोड या पाच ठिकाणी अग्निशामक केंद्रे आहेत. दहा गाड्या आणि 36 कर्मचाऱ्यांवर हा विभाग काम करतोय.
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी एक अग्निशामक गाडी देण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला आहे. पण, ती गाडी अजून मिळालेली नाही. आता नवीन केंद्र होणार असल्याने त्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर आता सोलापूर महापालिकेच्या अग्निशामक विभागात 45 फायरमनची (अग्निविमोचक) भरती केली जाणार आहे.