सौंदर्याच्या गुजगोष्टी :  सौंदर्यात भर घालणाऱ्या सोप्या परंतु महत्वाच्या टिप्स..! Simple but Important Beauty Tips in Daily Lifestyle

मार्केट मधील दिखाऊ फेसवॉश न वापरता चेहऱ्यानुसार डॉक्टर किंवा ब्युटीशिअनच्या सल्ल्याने आपल्या त्वचेचा प्रकार ओळखून त्यानुसार Facewash व facepack वापरणे आवश्यक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना स्वतःकडे लक्ष द्यायला खूप कमी वेळ मिळतो, परंतु आपल्या डेली स्कीनकेअर रुटीन मध्ये काही बेसिक बदल केले तर आपल्याला नक्कीच बदल जाणवेल. मार्केट मध्ये मिळणारे महागडे प्रोडक्ट चांगलेच असेल असे नाही. त्यामुळे याला किती बळी पडावे हे प्रत्येकाने ठरवावे. खाली काही टिप्स देत आहे ज्या तुम्हाला नक्की उपयोगी पडतील. (Important Beauty Tips in Daily Lifestyle)

ज्यांची त्वचा तेल सोडते (Oily Skin) म्हणजेच ऑईली आहे,  त्यांनी ऑईल कंट्रोल करणारे Product वापरले पाहिजेत जे आपल्या त्वचेतील एक्सेस ऑईल काढून टाकण्यासाठी मदत करतात परिणामी चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात.

कोरडी त्वचा (Dry Skin) असणाऱ्या व्यक्तींसाठी बदाम ऑईल खूप उपयोगी पडते. रोज रात्री चेहरा स्वच्छ धुवून त्यावर बदाम तेलाने मसाज केल्यास त्वचा टवटवीत होते व ड्रायनेस येत नाही. तसेच वयोमानानुसार चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्याही येत नाहीत. Simple but Important Beauty Tips in Daily Lifestyle परंतु ज्यांची स्कीन आईली आहे त्यांनी हा प्रयोग करू नये.

ओपन पोअर्स ही समस्या खूप कॉमन आहे याकडे दुर्लक्ष केल्यास त्वचा खराब सुद्धा लवकर होते. तसेच तरुण वयातील मुलींमध्ये पिंपल्सचे प्रमाण जास्त असते अशावेळी होमकअर वापरण्यासोबत चेहऱ्याचे क्लीन अप करणे अत्यंत गरजेचे असते.

बाजारातील कोणतेही Product खरेदी करताना आपण Simple but Important Beauty Tips in Daily Lifestyle वरील माहितीनुसार त्वचेचा पोत नक्की कसा आहे हे ओळखून Product घेतले आणि नियमितपणे त्याचा वापर केला तर त्वचेतील बदल नक्कीच दिसून येतील.

सायली नक्का, ब्युटिशियन & मेकअप आर्टिस्ट 
(अधिक माहितीसाठी संपर्क – 8605020071)