News

\’गुरूदत्त शुगर्स\’ शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांचं हक्काचं घर! गुरूदत्त कडून यंदा 500 कूटूंबांची व जनावरांची देखभाल | Shri Gurudatt Sugars

शिरोळ | धरण क्षेत्रात पडलेल्या पाऊसामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा काठाला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. याची दखल घेत पूरग्रस्त लोकांना आणि जनावरांना आधार देण्यासाठी एक हात मदतीचा म्हणून जनावरांची छावणी तसेच लोकांना निवाऱ्याची सोय करण्याचा निर्णय श्री गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे तसेच एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांनी घेतला.

Shri Gurudatt Sugars कारखान्यावर निवाऱ्याची, जेवणाची व्यवस्था तसेच जनावरांची छावणीची सोय करण्यात आली आहे. सध्या येथे 500 पूरग्रस्त नागरिक वास्तव्य करत असून त्यांच्या खाण्यापिण्यासह वास्तव्याचा व सुमारे 200 जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निकालात निघालेला आहे. गुरुदत्त शुगर्स च्या कामगारांवर या प्राण्यांची आणि कुटुंबांची देखभाल सोपवण्यात आली आहे. माधवराव घाटगे यांनी स्वनिधीतून छावणी सुरू केल्याने पूरग्रस्तातून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.

नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या गुरुदत्त शुगर्स लिमिटेड कारखान्याने कोणत्याही शासकीय मदतीविना सन 2005, 2019, 2021 आणि आता 2024 मध्ये आलेल्या महापुरात अनेक पूरग्रस्तांसह त्यांच्या जनावरांच्या निवाऱ्याची सोय करून पुन्हा आपल्या वेगळ्या उपक्रमाचा ठसा उमटवला आहे.

\"\"

सध्याच्या पूर परिस्थितीत शिरोळ तालुक्यातील राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, बस्तवाड आदी भागातील पूरग्रस्त त्यांच्या जनावरांच्या समवेत गुरुदत्त कारखान्याच्या निवारा शेडमध्ये विसावले आहेत. कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे व एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर राहूल घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी लोकाना मदत करीत आहेत.

दरम्यान यंदाच्या पूरसदृश्य परिस्थितीत कारखान्यावर एकूण 500 पूरग्रस्त नागरिक व 194 जनावरे स्थलांतरित झाले असून त्यांची संपूर्ण नियोजन कारखान्याचे वतीने योग्यरीत्या करण्यात येत आहे. यावर्षी देखील गुरूदत्त शुगर्सने सामाजिक बांधिलकी जपत अनेक पुरग्रस्तांना आणि त्यांच्या जनावरांना आपल्या आसऱ्यात सामावून घेतले आहे.

Back to top button