News

संजीवन इंग्लिश मिडीयम स्कूलतर्फे ‘पर्यावरण संवर्धन व प्लॅस्टिक मुक्ती’चा संदेश देत श्री गणेशाची प्रतिष्ठापना

कोल्हापूर | श्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संजीवन इंग्लिश मिडीयम स्कूल व लिटल वंडर्स प्ले ग्रुपच्यावतीने विविध शालेय उपक्रमाअंतर्गत श्री गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी रॅलीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन व प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश देत, ढोलताशाच्या गजरात गणरायाचे स्वागत करण्यात आले.

संजीवन इंग्लिश मिडीयम स्कूल व लिटल वंडर्स प्ले ग्रुपच्यावतीने सातत्याने पर्यावरण संवर्धन व प्लॅस्टिक मुक्ती यावर भर देत वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यंदाच्या गणेशउत्सवात देखील हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक काढली. मिरवणुकी दरम्यान विद्यार्थ्यांनी प्रबोधनपर फलक व प्रबोधनात्मक घोषणा देत सर्व परिसरात जनजागृती केली.

यावेळी प्लॅस्टिकमुक्त पर्यावरणासाठी कापडी पिशव्यांचा वापर करण्याची विनंती करण्यात आली. तसेच शाळेने सुरू केलेल्या कापडी पिशवी डोनेशन कॅम्पबद्दल नागरिकांना माहिती देऊन या उपक्रमात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले. सदर डोनेट केलेल्या कापडी पिशव्यांचे शहर परिसरातील बाजारपेठेत, सार्वजनिक ठिकाणी वाटप करून जगजागृती करण्याचा शाळेचा संकल्प आहे.

शाळेतील गणेशमुर्तीच्या सजावटीसाठी रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून तांत्रिक देखावा उभारण्यात आला आहे. त्याद्वारे देखील पर्यावरण संवर्धन व प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला. शाळेत गणेशाची प्रतिष्ठापना केल्यानंतर गायन, नृत्य, कथाकथन सादर करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपआपल्या कला सादर केल्या.

कार्यक्रम प्रसंगी स्कूलचे चेअरपर्सन मा. अमर सरनाईक, संचालक मा. युवराज पाटील, प्राचार्या सौ. अपूर्वा सरनाईक, उपप्राचार्या सौ. स्नेहा पाटील, वित्त अधिकारी ऐश्वर्या भवड, विभाग प्रमुख सुप्रिया किरवेकर, स्नेहा कदम, संध्या चिले, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Back to top button