News

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी पुन्हा मोठा ट्विस्ट; अजित पवार गटाच्या मागणीमुळे सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय

मुंबई | शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची अपडेट दिली आहे. आमदार अपात्रतेबद्दलची सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी एकत्र होईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायलयाने दिला होता. आमदार अपात्रता प्रकरणासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता शिवसेनेने ( एकनाथ शिंदे गट ) केली होती, परंतु राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली नाही.

अजित पवार गटाकडून सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी 

आमदार अपात्रता प्रकरणासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता शिवसेनेने केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वकिलांना कोर्टाने कागदपत्र जमा करण्यासाठी वेळ दिला होता. मात्र अजित पवार गटाकडून अद्याप त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली नाही.

त्यामुळे अजित पवार गटाने कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी वाढवून मागितला आहे. तसेच अजित पवार गटाच्या वकिलांनी ही सुनावणीच पुढे ढकलावी, अशी विनंती केली होती. ही विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. त्यानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी 2 आठवड्यानी पुढे ढकलण्यात आली आहे.

Back to top button