News

मुंबईत उध्दवसेनाच! पदवीधर मतदारसंघात अनिल परबांनी भाजपच्या उमेदवाराला चारली पराभवाची धूळ | Anil Parab

मुंबई | विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. मुंबई पदवीधर निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अनिल परब (Anil Parab) यांनी विजय मिळवला आहे. मुंबईतील पदवीधर, शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ अशा चार मतदारसंघात ही निवडणूक झाली आहे.

मुंबई पदवीधर निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अनिल परब आणि भाजपाचे उमेदवार किरण शेलार यांच्यात थेट लढत होती. अनिल परब यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला आहे. अनिल परब यांना या निवडणुकीत 44,791 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या किरण शेलार यांना 18,771 मते मिळाली आहेत. अनिल परब 26 हजार 20 मतांनी विजयी झाले आहेत.

मुंबई पदवीधर मतदारसंघात दीड लाखांच्या आसपास मतदार आहेत. गेली 30 वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्याचे ठाकरे गटापुढे मोठे आव्हान होते. यंदा भाजपचे किरण शेलार यांच्यासाठी भाजपने मुंबईतील आपली सर्व यंत्रणा कामाला लावली. मात्र त्यात त्यांना यश मिळू शकलेले नाही.

तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाच्या निरंजन डावखरे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत आपला गड कायम राखल्याचे दिसत आहे.

Back to top button