Thursday, June 8, 2023
HomeNewsSharad Pawar | पवारांचे राजीनाम्यावरून घुमजाव; अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याची पत्रकार परिषदेत घोषणा

Sharad Pawar | पवारांचे राजीनाम्यावरून घुमजाव; अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याची पत्रकार परिषदेत घोषणा

मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेतला असून तेच यापुढे अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत, अशी घोषणाच त्यांनी आज (ता. 5) पत्रकार परिषदेत केली. जनतेचे प्रेम आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर पक्षाचे अध्यक्षपदी कायम राहून कार्य करत राहणार असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रीय निवड समितीने शरद पवार यांचा राजीनामा एकमताने फेटाळला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम रहावे, अशी शरद पवारांना विनंती समिती केली. यावर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत आपली ठोस भुमिका मांडली.

शरद पवारांची जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा
यावेळी बोलताना, शरद पवार म्हणाले, मी सर्व जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी इच्छा होती. मी घेतलेल्या निर्णयाने जनमाणसांत तीव्र भावना निर्माण झाली. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, माझे सहकारी अस्वस्थ झाले होते. मी या निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी माझे हितचिंतक, माझ्यावर विश्वास असलेले कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी एकमुखाने मागणी केली होती.

अजित पवार या पत्रकार परिषदेला गैरहजर

अजित पवार या पत्रकार परिषदेला गैरहजर होते त्यावर शरद पवार यांनी स्पष्ट केले की, ”इथे कोण आहे कोण नाही याचा वेगळा अर्थ काढू नका. मी फेरविचार करावा हेच सर्वांचे मत होते.”

पवार म्हणाले हेच समाधानी जीवनाचे गमक

शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील निरनिराळे कार्यकर्ते यांनी अध्यक्ष राहावे अशी त्यांनी आग्रही विनंती केली. लोक माझे सांगाती हेच माझ्या समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. मी या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने तसेच देशातून विविध पक्षांच्या नेत्यांकडून आलेली आवाहने या सर्वांचा विचार करून मी पुन्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा मान राखून राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.

शरद पवार म्हणाले, माझी नैतिक जबाबदारी होती की, वरिष्ठांना विश्वासात घेणे, पण मी त्यांना विश्वासात घेतले असते तर त्यांनी मला राजीनामा देण्यास विरोध केला असता. त्यावेळीचा माझा निर्णय योग्य नव्हता या निष्कर्षापर्यंत मी आलो असे मला वाटते.

जनतेचे प्रेम बघून भारावलो

शरद पवार म्हणाले, मी कार्यकर्ते आणि जनतेचे प्रेम बघून भारावून गेलो. पक्षाची विचारधारा आणि ध्येयधोरणांसह काम करेल. उत्तराधिकारी असावा हे माझे स्पष्ट मत आहे. मी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतो हा निर्णय मी पुनश्च जाहीर करतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular