Friday, March 24, 2023
HomeCareerबँकेत नोकरीची संधी! स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत ८६८ रिक्त जागांची भरती...

बँकेत नोकरीची संधी! स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत ८६८ रिक्त जागांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | SBI Recruitment

मुंबई | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Recruitment) अंतर्गत “व्यवसाय प्रतिनिधी फॅसिलिटेटर” पदाच्या एकुण 868 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

पदाचे नाव – व्यवसाय प्रतिनिधी फॅसिलिटेटर
पद संख्या – 868 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयोमर्यादा – 63 ते 65 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2023
अधिकृत वेबसाईटsbi.co.in
PDF जाहिरातshorturl.at/gHQUX
ऑनलाईन अर्ज करा http://bit.ly/3ZEKLPG

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
व्यवसाय प्रतिनिधी फॅसिलिटेट शिक्षण: कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही कारण अर्जदार हे SBI, e-ABs आणि इतर PSB चे सेवानिवृत्त अधिकारी आहेत.
अनुभव (असल्यास): सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना संबंधित क्षेत्रात पुरेसा कामाचा अनुभव आणि एकूण व्यावसायिक क्षमता असणे आवश्यक आहे.विशेष कौशल्य / योग्यता: सेवानिवृत्त कर्मचार्‍यांकडे या पदासाठी आवश्यकतेनुसार विशेष कौशल्य / योग्यता / गुणवत्ता असणे आवश्यक आहे.
  1. उमेदवारांना SBI वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे.
  2. तसेच उमेदवर खालील दिलेल्या लिंक वरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  3. ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.
  4. उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
  5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  6. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023  आहे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular