मुंबई | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत सध्या विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती (SBI Bharti 2023) सुरू आहे. नुकतीच एसबीआयने प्रशिक्षणार्थी पदांच्या 6160 जागांची घोषणा केल्यानंतर आता परिविक्षाधीन अधिकारी (SBI PO Bharti 2023) पदाच्या 2000 रिक्त जागांच्या भरतीची घोषणा केली आहे.
या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2023 आहे.
PO पदाच्या भरतीची निवड प्रक्रिया तीन टप्प्यात घेतली जाणार आहे. यामध्ये, प्रेलीम्स (पूर्व), मेन्स (मुख्य) आणि मुलाखत यांचा समावेश आहे. SBI शाखांमध्ये PO म्हणून निवड होण्यासाठी उमेदवारांना तीनही टप्प्यासाठी पात्र असणे आवश्यक आहे.
पदसंख्या – 2000 जागा
जनरल: 810 जागा, ओबीसी: 540 जागा, ईडब्ल्यूएस: 240 जागा, एससी: 300 जागा, एसटी: 150 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा केंद्र सरकारने मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच, अंतिम वर्ष/सेमिस्टरचे उमेदवार मुलाखतीच्या तारखेला त्यांच्या पदवीचा पुरावा सादर करता येईल अशेच उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांना बँकेच्या ‘करिअर’ वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers द्वारे ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीनंतर उमेदवारांनी डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग वापरून ऑनलाइन पद्धतीने आवश्यक अर्ज फी भरणे आवश्यक आहे. 7 सप्टेंबर 2023 पासून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येतील.
- प्रिलिम्स लेखी परीक्षा (CBT)- (100 गुण)
- मुख्य लेखी परीक्षा (CBT) + वर्णनात्मक परीक्षा- (250 गुण)
- मुलाखत/ गट चर्चा- (50 गुण)
- दस्तऐवज पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
PDF जाहिरात – SBI PO Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज – SBI PO Bharti 2023 (लिंक सुरु)
सिल्याबस आणि एक्साम पटर्न PDF – SBI PO Exam & Syllabus Pattern
अधिकृत वेबसाईट – sbi.co.in