सातारा | सातारा जिल्ह्यासाठी तलाठी पदभरती-२०१९ चे अनुषंगाने प्रसिध्द करणेत आलेल्या जाहिरात क्र.मह/२/आस्था/२/कावि-१८९/१९, दिनांक २८/०२/२०१९ प्रमाणे नॉन क्रिमिलेअर तत्व लागू असलेल्या प्रवर्गामधून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांकरिता प्रसिध्दीपत्रक काढण्यात आले आहे.
जिल्हा निवड समिती, सातारा जिल्हा यांनी दिनांक – १७/०१/२०२३ रोजीच्या बैठकीमध्ये मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांचेकडील मुळ अर्ज क्र. ७०१/२०२२ मध्ये मा. न्यायाधिकरणाकडून दिनांक ०९/०१/२०२३ रोजी पारीत करणेत आलेल्या अंतिम निर्णयानुसार नॉन क्रिमिलेअर तत्व लागू असलेल्या प्रवर्गांमधून दिनांक- ३१/०३/२०१९ पर्यंत वैध असलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्ग व समांतर आरक्षणनिहाय निवड केलेली आहेत.
निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देणेच्या अनुषंगाने जिल्हा निवड समितीकडून खालीलप्रमाणे कालबध्द कार्यक्रम निश्चित करणेत आला आहे, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. नॉन क्रिमिलेअर तत्व लागू असलेल्या प्रवर्गांमधील अद्याप नियुक्तीवर प्रलंबित असलेल्या पदांवर पात्र उमेदवारांची निवड करुन नियुक्त्या देणेच्या अनुषंगाने निश्चित करणेत आलेला कालबध्द कार्यक्रम पुढीलप्रमाणे..

- निवड व प्रारुप प्रतिक्षा यादी प्रसिध्दीपत्रक (589 KB)
- OBC (General) – Prov. waiting list (356 KB)
- Open (Female) – Prov. Waiting List (476 KB)
- OBC (Female) – Prov. Select List (402 KB)
- OBC (Female) – Prov. Waiting List (481 KB)
- Open (Female) – Prov. Select List (441 KB)
तलाठी भरती 2019 EWS श्रेणी-निवड, प्रतीक्षा यादी आणि वेळापत्रक जाहीर | Satara Talathi Bharti Result
सातारा | 28/12/2022 | जिल्हा निवड समिती, सातारा जिल्हा यांनी दिनांक – २२/१२/२०२२ रोजीच्या बैठकीमध्ये शासन निर्णय दिनांक – ३१/०५/२०२१, ०५/०७/२०२१ व शासन परिपत्रक दिनांक- २१/११/२०२२ अन्वये शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार एसईबीसी प्रवर्गाच्या ईडब्ल्यूएस विकल्प सादर केलेल्या उमेदवारांपैकी गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची ईडब्ल्यूएस प्रवर्गामध्ये समांतर आरक्षणनिहाय निवड केलेली आहेत.
निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देणेच्या अनुषंगाने जिल्हा निवड समितीकडून खालीलप्रमाणे कालबध्द कार्यक्रम निश्चित करणेत आला आहे, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. या पदभरतीचा निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
या पदभरतीचा निकाल डाउनलोड करा Satara Talathi Bharti 2019