Sunday, September 24, 2023
HomeCareerसातारा - 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी, 500 रिक्त जागा | Satara...

सातारा – 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी, 500 रिक्त जागा | Satara Jobs 2023

सातारा | सातारा जिल्ह्यातील बेरोजगार आणि नवीन ठिकाणी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची (Satara Jobs 2023) चांगली संधी निर्माण झाली आहे. एकूण 500 रिक्त जागांसाठी ही भरती केली जात असून इच्छूकांनी 5 ऑगस्ट रोजी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

रिसेप्शनिस्ट, ट्रेनी, सेल्स अँड मार्केटिंग, मेकॅनिक, सेल्स एक्जिक्युटिव्ह, ऑपरेटर, सीएनसी -वीएमसी ऑपरेटर, डिझाईन इंजिनिअर, क्वालिटी इन्सपेक्टर तसेच सिनिअर ऑफिसर पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी शासनाच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

वरील रिक्त पदांसाठी 10वी, 12वी, ITI, Diploma तसेच पदवीधर उमेदवार पात्र आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी 5 ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा परिषद चौक सातारा येथे मुलाखतीसाठी हजर राहावे.

PDF जाहिरात – Satara Jobs 2023
नोंदणी – Register Here

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular