सातारा | राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभाग अंतर्गत सातारा जिल्ह्यात ‘मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस’ पदांची भरती (Satara Anganwadi Bharti 2023) केली जाणार आहे. यासाठी 12वी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
Satara Anganwadi Bharti 2023 – एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) सातारा पूर्व या प्रकल्पांतर्गत रिक्त असलेली “मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस” यांची मानधनी पदे सरळ नियुक्तीने भरली जाणार आहेत. यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक 1 ऑगस्ट 2023 आहे. सायंकाळी 6.15 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील. अंतिम दिनांकानंतर आलेल्या किंवा डाकेद्वारे (पोस्टाद्वारे) विलंबाने पोहचलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) सातारा पूर्व, नूतन मराठी शाळेसमोर, मंगळवार पेठ, कराड, जि.सातारा
PDF जाहिरात – Satara Anganwadi Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – www.satara.gov.in