Saturday, September 23, 2023
HomeCareerसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत मोठी भरती | Sant Gadge Baba...

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत मोठी भरती | Sant Gadge Baba Amravati University Recruitment 2023

अमरावती | संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (Sant Gadge Baba Amravati University) अंतर्गत सुदाम शिक्षण प्रसारक मंडळाचे यवतमाळ येथे विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

याठिकाणी, प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 15 दिवसांच्या आत करण्याचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष/सचिव, सुदाम शिक्षण प्रसारक मंडळ, मातोश्री नानीबाई घारफळकर विज्ञान महाविद्यालय बाभुळगाव, जिल्हा – यवतमाळ, 445101

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 15 दिवसांच्या आत करण्याचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. पात्रता, /अनुभव/पे स्केल आणि इतर तपशील / शर्तीं यासाठी विद्यापीठाच्या वेबसाइट www.sgbau.ac.in वरून अधिक माहिती घ्यावी जे पात्र उमेदवार आधीच सेवेत आहेत त्यांनी योग्य चॅनेलद्वारे अर्ज सादर करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.

PDF जाहिरात Sant Gadge Baba Amravati University Bharti 2023
अधिकृत वेबसाईटwww.sgbau.ac.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular