News

राष्ट्रीय सी.बी.एस.ई ज्युडो स्पर्धेत संजीवन रंकाळाचे घवघवीत यश

कोल्हापूर | श्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल रंकाळाचे राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.

झारखंड येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत १४ वर्षाखालील वयोगटात इयत्ता ८वी मध्ये शिकत असलेली कुमारी लावण्या इंद्रजीत पाटील हिने कांस्यपदक पटकावले तर इयत्ता ८वी मध्ये शिकत असलेली कुमारी चैतन्य इंद्रजीत पाटील हिने ४४ किलो वजन गटात कास्यपदक पटकावले.

या खेळाडूंना स्कूलचे चेअर पर्सन अमर सरनाईक, संचालक युवराज पाटील, प्राचार्या अपूर्वा सरनाईक, उपप्राचार्य स्नेहा पाटील, वित्त अधिकारी ऐश्वर्या भवड, ज्युडो प्रशिक्षक अजिंक्य पोवार, क्रीडा शिक्षक सिद्धार्थ कुराडे, रामेश्वरी बटकडली, विभाग प्रमुख सुप्रिया किरवेकर, स्नेहा कदम, संध्या चिले व पालक यांचे मार्गदर्शन लाभले.

Back to top button