News

राज्यस्तरीय सी.बी.एस.ई स्पर्धेत संजीवन इंग्लिश मीडियम स्कूलचे घवघवीत यश, विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर | श्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संजीवन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सी.बी.एस.ई. अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले. या विद्यार्थांची आता झारखंड तसेच उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

अहमदनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत कु. लावण्या इंद्रजीत पाटील (इयत्ता आठवी) हिने १४ वर्षाखालील ३६ ते ४० किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तर कु. चैतन्या इंद्रजीत पाटील हिने १४ वर्षाखालील ४० ते ४५ किलो वजनी गटामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या दोन्हीही विद्यार्थिनींची झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत १४ वर्षाखालील ३५ ते ३८ किलो वजनी गटामध्ये कु. आराध्य भास्कर कुंभार इयत्ता सातवी याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. तर १७ वर्षाखालील ५१ ते ५५ या वजनी गटांमध्ये इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी कु. दर्शील प्रशांत पोवार यांने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थ्यांची उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सांगली येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत इयत्ता सहावी मध्ये शिकत असलेला कु. राजवीर सुरज साळोखे याने या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थ्यांना स्कूलचे चेअर पर्सन मा. अमर सरनाईक, संचालक मा. युवराज पाटील, प्राचार्या सौ. अपूर्वा सरनाईक, उपप्राचार्य सौ. स्नेहा पाटील, वित्त अधिकारी ऐश्वर्या भवड, क्रीडा शिक्षक सिद्धार्थ कुराडे, प्रशिक्षक अजिंक्य पोवार, रामेश्वरी बटकडली यांचे मार्गदर्शन लाभले.

Back to top button