Tuesday, September 26, 2023
HomeCareerछत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत 114 पदांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची संधी | Sambhaji...

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत 114 पदांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची संधी | Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2023

छ. संभाजीनगर | छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती (Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2023) केली जाणार आहे. या पदभरती अंतर्गत 114 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत, ‘कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), लेखा परीक्षक (गट क), लेखापाल, विद्युत पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक (गट-क), स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रमुख अग्निशामक, उद्यान सहाय्यक, कनिष्ठ लेखा परीक्षक, अग्निशामक, लेखा लिपिक’ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वरील रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2023 आहे. 

PDF जाहिरातSambhaji Nagar Mahanagarpalika Recruitment 2023 
ऑनलाईन अर्ज कराSambhaji Nagar Mahanagarpalika Application 2023
अधिकृत वेबसाईटwww.aurangabadmahapalika.org

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular