समरजित घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर! Samarjit Ghatge
श्रेणिक नरदे यांच्या फेसबुक वॉलवरून
राजे समरजित घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर आहेत अशा चर्चा आहेत. खरंतर राजेंनी हा पक्ष प्रवेश करावाच. हसन मुश्रीफ यांचा पराभव मागच्यावेळी होता होता राहिला. कागल मध्ये जसा मुश्रीफांना मानणारा वर्ग आहे. तसाच शरद पवार साहेबांना मानणाराही मोठा वर्ग आहे.
राजे आता भाजपात असले तरी मुश्रीफांचा कट्टर विरोधक म्हणूनच त्यांच्या मागे जनता आहे. भाजप मधून जर पक्षांतर केलं तरीही हि मागची मतं कुठंही जाणार नाहीत. ती राजेंसोबतच असतील.
आज कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचं नेतृत्व करायलाही कुणी खमका किंवा मोठा माणूस नाही. जर राजेंनी इकडे प्रवेश केला तर ते संपूर्ण जिल्ह्याचे नेतृत्व करतील. आज ते भाजपमध्ये आहेत मात्र जिल्ह्याचे नेतृत्व हे महाडिक साहेबांकडे आहे. त्यामुळं ईकडे संपूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी आहे.
महाविकास आघाडीची सत्ता आल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रीपदाचे प्रमुख दावेदार राजेच असतील. मुश्रीफांना संजय घाटगेंनी जरी पाठिंबा दिला असला तरीही त्यांच्यामागे असणारे कार्यकर्ते मुश्रीफांना मतं टाकतील याचा काही नेम नाही.
गेल्या पाच दहा वर्षांपासून सातत्याने कष्ट घेऊन राजेंनी कागलमधील जनतेत परिवर्तनासाठी ग्राऊंड तयार केलेलं आहे. यावेळी फार मोठी संधी आलेली आहे. ती संधी राजेंनी सोडू नये. बिनधास्तपणे प्रवेश करावा. फडणवीसही या निर्णयाला विरोध करणार नाहीत. तसंच अपक्ष राहण्याचा विचार राजे करत असतील तर तो त्यांनी सोडून द्यावा. अपक्ष राहून हाती काहीच लागणार नाही.
राजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आल्यास जिल्ह्याचे नेतृत्व, सत्ता आल्यानंतर मंत्रीपद आणि पक्षासोबत येणारी महाविकास आघाडीची मतं यांचा जरूर विचार करावा… अशी संधी वारंवार येत नसते.