कोल्हापूर | राज्यातील 23 जिल्ह्यांत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची पदे गेल्या चार वर्षांपासून रिक्त (RTO Recruitment 2023) आहेत. त्यांचा पदभार उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे तात्पुरता दिला आहे. त्यात कोल्हापूरचाही समावेश असून, गेल्या आठ वर्षांत कोल्हापूर मधील पद रिक्त आहे.
कोल्हापूरात प्रभारी अधिकाऱ्यांवरच जबाबदारी आहे. त्यामुळे दोन जिल्ह्यांचा कारभार असलेल्या या कार्यालयास प्रादेशिक परिवहन अधिकारी कधी मिळणार, याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. याबरोबरच परिवहन विभागांतर्गत 28 जिल्ह्यांपैकी 23 जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारीच नसल्याचे समोर आले आहे.
नव्या आकृतिबंध कार्यक्रमात कोल्हापूर, सांगलीसाठी एक प्रादेशिक परिवहन अधिकारी, तर सातारा, कराडसाठी एक अशी दोन पदे निर्माण करण्यात आली आहेत.
जळगाव | जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास ‘आरटीओ’चा दर्जा बहाल केल्यानंतर आता त्यासाठी आवश्यक 100 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आकृतिबंधही मंजूर करण्यात आला आहे. नव्याने निर्माण होणाऱ्या पदांची भरती प्रक्रियाही लवकरच राबविण्यात येणार आहे. (RTO Recruitment 2023)
यापूर्वी जळगावचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय धुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयाच्या अधनिस्त होते. आता जळगाव जिल्ह्यासाठी स्वतंत्र आरटीओचा दर्जा प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील संबंधित कामे गतीने होतील, अशी अपेक्षा आहे. (RTO Recruitment 2023)
गेल्या काही वर्षांपासून जळगाव कार्यालयास ‘आरटीओ’चा दर्जा मिळण्यासाठी मागणी व पाठपुरावा सुरू होता. जळगावसह राज्यातील 9 उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना ‘आरटीओ’चा दर्जा देण्याबाबत शासनाने 23 जूनच्या निर्णयाद्वारे मान्यता दिली. यात जळगावसह पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अहमदनगर, वसई (जि. पालघर), चंद्रपूर, अकोला, बोरीवली (मुंबई), सातारा या कार्यालयांना आता प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा दर्जा देण्यात आला आहे.
पदभरतीच्या सूचना (RTO Recruitment 2023)
दर्जा बदलल्याने नव्याने निर्माण होणारी पदे व अतिरिक्त भरावयाच्या पदांचे फेरवाटप, नियुक्ती, नवीन पद भरती, त्यांचे वेतन व भत्ते याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाने निधीची तरतूद करावी. त्यास शासनाची मंजुरी घेऊन तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही या निर्णयाद्वारे दिल्या आहेत.
नागपूर | प्रादेशिक परिवहन विभाग नागपूर, जवळपास १५ वर्षांपासून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोठ्या तुटवड्याशी लढत आहे. अनेक पदे रिक्त आहेत. कामाचा भार आहे. असे असतानाही रिक्त पदांवर नियुक्ती होत नसल्याने पदोन्नतीचे दावेदार केले जात आहेत.
प्रादेशिक परिवहन कार्यालयात (शहर) उपप्रादेशिक व सहायक परिवहन अधिकारी हे पद दीर्घकाळापासून रिक्त आहे. आरटीओ निरीक्षक, उपनिरीक्षक, लिपिक वर्ग आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (पूर्व नागपूर), प्रादेशिक परिवहन कार्यालय (ग्रामीण) आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (वर्धा) येथेही अनेक पदे रिक्त आहेत.
राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. काही दिवसांपूर्वी नागपुरात आलेल्या विवेक भीमनवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली होती. डॉ. भीमनवार यांनीही सर्व रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
248 पदांवर नियुक्तीची प्रतीक्षा
प्रादेशिक परिवहन कार्यालयात (शहर) एकूण ६१ पदे रिक्त आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यालयात 146 मंजूर पदे असून, त्यापैकी 85 पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे 1 पद, मोटार वाहन अभियोक्ताचे 1 पद आणि मोटार वाहन निरीक्षकाची 10 पदे रिक्त आहेत.