Saturday, September 23, 2023
HomeCareerनागपूर विद्यापीठात विना परीक्षा थेट मुलाखतीद्वारे 92 रिक्त जागांसाठी भरती | RTMNU...

नागपूर विद्यापीठात विना परीक्षा थेट मुलाखतीद्वारे 92 रिक्त जागांसाठी भरती | RTMNU Nagpur Bharti 2023

नागपूर | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती (RTMNU Nagpur Bharti 2023) केली जाणार आहे. ‘प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक‘ पदाच्या 92 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, कॅम्पस स्क्वेअर ते अंबाझरी टी-पॉइंट मार्ग, नागपूर – 440033 (एमएस).

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ई-मेल आणि फॅक्सद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. कोणत्याही बाबतीत अपूर्ण असलेले अर्ज नाकारले जातील. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2023  आहे. विहित अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील आणि उमेदवाराशी या संदर्भात कोणताही संवाद साधला जाणार नाही.

वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी अर्जदारांना कोणत्याही टीए/डीएचा हक्क मिळणार नाही. उमेदवाराच्या मागील रेकॉर्ड आणि मुलाखतीदरम्यानच्या कामगिरीच्या आधारावर निवड केली जाईल. विद्यापीठ निवडीची पद्धत म्हणून चर्चासत्र/संवाद आणि/किंवा इतर कोणत्याही पद्धतीचा वापर करू शकते.

PDF जाहिरातRTMNU Nagpur Jobs 2023
अर्ज नमुना Application Form
अधिकृत वेबसाईटwww.nagpuruniversity.ac.in 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular