Tuesday, October 3, 2023
HomeCareerRTE अर्जासाठी आज शेवटचा दिवस; लाॅटरीची तारीख कधी? RTE Admission 2023 

RTE अर्जासाठी आज शेवटचा दिवस; लाॅटरीची तारीख कधी? RTE Admission 2023 

मुंबई | शिक्षणाचा हक्क कायदा आरटीई अंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये माेफत प्रवेशासासाठी ऑनलाईन अर्ज (RTE Admission 2023) करण्याचा आज, शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. पालकांना आज दुपारी बारापर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. राज्यभरात दि. १६ मार्च अखेर रिक्त जागांच्या तिप्पट म्हणजे ३ लाख ५ हजार अर्ज प्राप्त अर्ज प्राप्त झाले हाेते.

आरटीईअंतर्गत रिक्त जागांवर प्रवेशासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करण्यास दि. १ मार्च राेजी सुरुवात झाली. त्यानंतर पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साेळा दिवसांत राज्यभरातून तीन लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यातील ८ हजार ८२८ खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये १ लाख १ हजार ९६९ जागा रिक्त आहेत.

पुण्यात ६६ हजार अर्ज Pune RTE Admission 2023 
आरटीईअंतर्गत पुणे जिल्ह्यातील ९३६ शाळांमध्ये रिक्त असलेल्या १५ हजार ६५५ जागांसाठी ६६ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. नाशिक ४,८५४ रिक्त जागांसाठी १८ हजार १३०, तर सातारा जिल्ह्यात १,८२१ जागांसाठी ३८२६ अर्ज आले आहेत.

लवकरच लाॅटरीची तारीख जाहीर हाेणार RTE Lottery Result 2023

ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर ऑनलाइन साेडत लाॅटरी काढण्याकरिता तारीख निश्चित करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व रिक्त जागांसाठी एकाच टप्प्यात लाॅटरी काढून शाळांमध्ये आरटीई अंतर्गत रिक्त जागांएवढी प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. लाॅटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुरेसा कालावधी देण्यात येणार आहे.

‘आरटीई’अंतर्गत प्रवेशासाठी पालकांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १ मार्चपासून सुरू झाली होती. त्यासाठी १७ मार्चपर्यंत मुदत असून, राज्यभरातून या प्रवेशप्रक्रियेला पालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दहा दिवसांतच या प्रवेशांसाठी राज्यभरातून एक लाख एक हजार ९६९ जागांसाठी दोन लाखांवर प्रवेश अर्ज दाखल झाले आहेत.

राज्यभरातून सुरू असलेल्या या प्रक्रियेमुळे मूळ पोर्टलवरील अर्ज दाखल करण्याच्या student.maharashtra.gov.in लिंकला अनेक समस्या येत होत्या. ही समस्या लक्षात घेऊन साइट संथ असल्यास पुन्हा अर्ज भरण्याचा प्रयत्न करण्याची सूचनाही शिक्षण विभागामार्फत देण्यात आली होती. परंतु, गेल्या काही दिवसांत समस्या अधिकच वाढल्याने अनेक पालकांनी पैसे खर्च करून इंटरनेट कॅफेमध्ये अर्ज भरण्यास प्राधान्य दिले.

या समस्यांमुळे वैतागलेल्या पालकांनी ही सुविधा सुरळीत करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आरटीई प्रवेश अर्जांसाठी rte25admission.maharashtra.gov.in ही पर्यायी लिंकही उपलब्ध करून देण्यात आली आहे. १७ मार्चला मध्यरात्री बारा वाजेपर्यंत पालकांना मूळ पोर्टल किंवा नव्याने उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर अर्ज दाखल करता येणार आहे.

ऑनलाईन अर्ज कुठे करणार? RTE Admission 2023

यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत 8 हजार 827  शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 926 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज आणि प्रवेश प्रक्रिया, कागदपत्रांबाबतची माहिती https://student.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

…तर अर्ज बाद होणार

प्रवेश प्रक्रियेसाठी लॉटरीसाठी अर्ज विचारात घेतला जावा यासाठी अनेक पालक एकापेक्षा अधिक अर्ज भारतात. मात्र, यंदापासून एकहून अधिक अर्ज भरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एका विद्यार्थ्याचे एकापेक्षा अधिक अर्ज भरले असल्याचे निदर्शनास आल्यास त्याचा अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही, हे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

लॉटरी कधी निघणार?

ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ऑनलाईन लॉटरीची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. 25 टक्के आरक्षणातंर्गत जागांसाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढण्यात येणार आहे. शाळेतील जागांनुसार प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात येईल. लॉटरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाणार असल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना कागदपत्रे घेऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

आरटीईसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे

आरटीईसाठी अर्ज निवासी पुराव्यात ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यातील एका पुरावा ग्राह्य धरता येण्यार आहे. या शिवाय जन्मतारखेचा पुरावा, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय पुरावा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल संवर्गातून येत असल्याचा वार्षिक उत्पन्नाचा पुरावा, अनाथ बालकांची आवश्यक प्रमाणपत्रे, विधवा/ घटस्फोटीत महिला असल्याचा पुरावा अशी विविध कागदपत्रे ही प्रवेशाच्या वेळी पालकांना सादर करावी लागणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular