Career

10 वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी; 6180 रिक्त जागा, त्वरित अर्ज करा । RRB Technician Bharti 2025

RRB Technician Bharti 2025: रेल्वे भरती मंडळ (RRB) अंतर्गत तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरीच्या संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. RRB मार्फत “तंत्रज्ञ ग्रेड-I (सिग्नल)” आणि “तंत्रज्ञ ग्रेड III” या पदांसाठी एकूण 6,180 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून 28 जून 2025 पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 जुलै 2025 आहे.

या भरती अंतर्गत तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल साठी 180 जागा तर तंत्रज्ञ ग्रेड III साठी तब्बल 6,000 जागा उपलब्ध आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. तंत्रज्ञ ग्रेड-I साठी उमेदवारांकडे डिप्लोमा, बी.एस्सी. किंवा बीई/बी.टेक ची पदवी असावी लागते. तर तंत्रज्ञ ग्रेड III साठी १०वी, ITI किंवा १२वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

RRB Technician Bharti 2025

वयोमर्यादेच्या अनुषंगाने, दोन्ही पदांसाठी उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया संगणक आधारित चाचणीच्या माध्यमातून होणार आहे. वेतनश्रेणीबाबत सांगायचे झाल्यास, तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल पदासाठी उमेदवारांना दरमहा ₹29,200/- तर तंत्रज्ञ ग्रेड III साठी ₹19,900/- एवढे वेतन मिळेल.

जाहिरातीसंदर्भातील अधिक माहिती व अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://rrbmumbai.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

तंत्रज्ञ पदासाठीची ही भरती एक स्थिर आणि प्रतिष्ठित सरकारी नोकरी मिळविण्याची मोठी संधी असून, सर्व इच्छुक उमेदवारांनी वेळेवर अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/bL22Z
ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/xQ69J
अधिकृत वेबसाईटhttps://indianrailways.gov.in/

Sakshi Suryawanshi

साक्षीने संगणक शाखेतील (BCA) पदवी संपादन केली आहे. मात्र पत्रकारितेची आवड असल्यामुळे 2021 पासून ती Lokshahi.News सोबत कार्यरत आहे. Lokshahi News मध्ये ती माहितीची शहानिशा, विविध स्रोतांमधून आलेल्या बातम्यांचे विश्लेषण, तसेच योग्य प्रकारे संपादन व प्रसिद्धी यावर लक्ष केंद्रित करते.
Back to top button