Career

केंद्र सरकारच्या ‘या’ प्रकल्पामुळे महाराष्ट्रात हजारो लोकांना मिळणार रोजगाराच्या संधी! Rojgar Varta

पालघर | केंद्र सरकारच्या माध्यमातून वाढवण येथे उभारण्यात येणाऱ्या बंदरामुळे हजारो स्थानिकांना रोजगाराचे (Rojgar Varta) साधन निर्माण होणार आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील स्थलांतरासह विकासाची समस्या दूर होणार आहे. या प्रकल्पामुळे अनेक लहान-मोठ्या जोड व्यवसायांची साधने उपलब्ध होणार आहे.

यासाठी भरती प्रक्रिया, कौशल्य प्रशिक्षण सुरू झाले आहे. पालघर जिल्ह्यात काही प्रमाणात डायमेकर व्यवसाय आहे. त्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी आहे. आता वाढवण बंदर प्रकल्पात बहुउद्देशीय व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र उभारणीला सुरुवात केली जाणार आहे. पहिल्या प्रकल्पासाठी व्ही.पी.एल. आणि जहाज महासंचालनालय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. स्थानिक युवकांना कौशल्ये प्रदान करण्यापासून डाई उत्पादकासाठी ब्रॅण्डिंग, वित्तपुरवठा, प्रगत प्रशिक्षण पुरविण्यापर्यंत उपक्रम आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी संधी उपलब्ध करणार आहे.

डहाणू आणि पालघर तालुक्याच्या निवडक गावांसाठी एकात्मिक कृषी, बागायती योजना तयार करत ती अमलात आणली जाणार आहे. मच्छीमारांसाठी नुकसानभरपाई धोरण, दोन बंदरांच्या बांधकामासाठी सुमारे ३०० कोटींचा निधी दिला जाणार आहे. टिकाऊ आणि पर्यावरणपूरक साधनांचा समावेश केला जाणार आहे. या बंदरामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान लोकांचे होणार नाही. जास्तीत जास्त रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न केला जाणार आहे.

पालघर जिल्ह्यात रोजगाराची साधने अत्यल्प असल्याने इथल्या स्थानिकांना मुंबई, ठाणे गाठावे लागते. त्यातच स्थलांतराची गंभीर समस्या आहे. त्यामुळे वाढवण बंदराचा प्रकल्प हजारो रोजगारांची निर्मिती करणार आहे. त्याचा फायदा स्थानिकांना होणार असून अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. नागरिकांचे जीवनमान, राहणीमान उंचावण्यास यामुळे मदत होणार आहे.

स्थानिकांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी वाढवण बंदर उभारणीपूर्वी मागणी करण्यात होती. वाढवण बंदर परिसरातील लोकांसाठी विविध उपक्रम जेएनपीए राबवणार आहे. वाढवण बंदर भरणीला सुरुवात करण्यापूर्वी येथील तरुणांना प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास कार्यक्रम जवाहरलाल नेहरू बंदर परिसरात राबविण्यात आला आहे.

– वाढवण बंदरामुळे १२ लाख रोजगाराच्या संधी
– समुदाय विकास, आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न
– स्थानिकांसाठी कौशल्य विकास उपक्रम
– पालघर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी
– स्थानिक व्यवसायाला उभारी

Back to top button