व्हॅक्सिंग केल्यावर त्वचेवर उठतेय पुरळ करून पहा ‘हे’ सोपे उपाय; Remedies on rashes after waxing

आपण सुंदर दिसावे असे प्रत्येक स्त्रीलाच वाटत असते. यासाठी आपण घरगुती उपाय तर करतोच पण त्याचबरोबर पार्लर मध्येही जातो. त्वचेची काळजी घेताना आपण Skin Whitening, व्हॅक्स इत्यादी गोष्टी करत असतो. तुम्ही जर व्हॅक्स करत असाल तर बऱ्याचदा आपल्या हातावर लाल पुरळ उठते ज्यामुळे खाज येते. Remedies on rashes after waxing ही पुरळ लवकर जावी असे वाटत असेल तर त्यासाठी खालील उपाय करून पहा, आपल्याला नक्कीच फरक जाणवेल.

नारळ तेलाने करा मसाज –

नारळ तेल हे त्वचा आणि केसांसाठी अतिशय गुणकारी समजले जाते. याच नारळ तेलाने आपण व्हॅक्स केल्यानंतर मसाज करू शकता ज्यामुळे आपली त्वचा खाज येऊन काळी किंवा खरबरीत न होता ती मऊ होण्यास मदत होते. तसेच शरीरातील उष्णता, Remedies on rashes after waxing जळजळ कमी करण्याचे काम करते. नारळ तेल आपल्याला सुट होत असेल तरच वापरावे अन्यथा आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

एलोवेरा जेल ने करा हलका मसाज –

एलोवेरा जेल मधील घटक त्वचेला थंडावा देण्याचे काम करतात. आपल्या त्वचेवर व्हॅक्स केल्याने लालसरपणा येतो, त्वचेला खाज उठत असेल तर आपण एलोवेरा जेलचा अवश्य वापर करावा. व्हॅक्स केल्यानंतर हात कोमात पाण्याने स्वच्छ पुसून घ्यावेत आणि त्यावर एलोवेरा जेलने हळूवार मसाज करावा. यामुळे त्वचेवरील लालसरपणा जाईल व तसेच खाज कमी होण्यास मदत होईल.

तूपाने करा मसाज –

बऱ्याचदा आपण बाहेरच्या प्रॉडक्ट वरती विश्वास ठेवतो आणि तेच वापरतो परंतु त्याहीपेक्षा जुन्या आणि घरात सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टींचे अनेक फायदे आपल्याला होतात… जसे की तूप. व्हॅक्स केल्यानंतर खाज व लालसरपणा जावा म्हणून व्हॅक्स केलेल्या त्वचेवर तुम्ही तूप लाऊ शकता.Remedies on rashes after waxing तुपाने मसाज केल्यास त्वचा मऊ होण्यास मदत होते व लालसरपणा कमी होतो.

व्हॅसलीन –

थंडीच्या दिवसात फाटणारे ओठ असो की त्वचा कोरडी पडणे असो यावर सर्वोत्तम आणि जुना उपाय म्हणजे व्हॅसलीन. तुम्ही व्हॅक्स केल्यानंतर सुद्धा व्हॅसलीन लावू शकता. जेणेकरून त्वचा लाल होणार नाही व त्वचेला प्रोटेक्शन मिळेल.

अशाप्रकारे सोपे परंतु महत्वाचे उपाय आपण केल्यास त्वचेवर येणारी खाज,Remedies on rashes after waxing पुरळ तसेच लालसरपणा यामुळे होणारे त्वचेचे नुकसान तुम्ही नक्कीच टाळू शकता.