Tuesday, October 3, 2023
HomeCareerग्रामीण विद्युतीकरण निगम लि. अंतर्गत पदवीधरांना नोकरीची संधी, मिळेल लाखाहून अधिक पगार...

ग्रामीण विद्युतीकरण निगम लि. अंतर्गत पदवीधरांना नोकरीची संधी, मिळेल लाखाहून अधिक पगार | REC Limited Bharti 2023

मुंबई | ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (REC Limited Bharti 2023) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी, महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, अधिकारी, सहायक अधिकारी, उपमहाव्यवस्थापक, आणि मुख्य व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे.

वरील रिक्त पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यात येणार असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर  2023 आहे.

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अपूर्ण अर्ज सरसकट फेटाळले जातील. अर्जात काही तफावत आढळल्यास, उमेदवारी सरसकट नाकारली जाईल. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.

वरील पदांकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल. केवळ पात्रता निकषांची पूर्तता केलेल्या अर्जदाराला मुलाखती/निवड प्रक्रियेसाठी बोलावण्याचा कोणताही अधिकार मिळणार नाही. योग्य ठरलेल्या अर्जदारांना लेखी चाचणी आणि/किंवा मुलाखतीसाठी बोलावले जाईल, ज्यासाठी पोर्टलद्वारे आणि अर्जासोबत सूचित केलेल्या ईमेलद्वारे स्थळ आणि वेळ सूचित केले जाईल. निवड लेखी चाचणी आणि/किंवा मुलाखतींवर आधारित असेल ज्यांचे गुणाेत्तर अनुक्रमे 85% आणि 15% असेल.

PDF जाहिरात – REC Limited Vacancy 2023
ऑनलाईन अर्ज कराApply For Rural Electrification Corporation Limited
अधिकृत वेबसाईटrecindia.nic.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular